५३ ग्रामपंचायतींच्या धुरक-यांसाठी मतदान
By admin | Published: August 31, 2015 01:19 AM2015-08-31T01:19:24+5:302015-08-31T01:19:24+5:30
सरपंच-उपसरपंच निवडणूक; पार्डी ताड व मोठेगाव सरपंचपद रिक्त.
वाशिम : जिल्हय़ातील मंगरूळपीर, कारंजा, रिसोड आणि मालेगाव तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंच पदाची शेवटच्या टप्प्यातील निवडणूक ३0 ऑगस्ट रोजी घेण्यात आली. मंगरुळपीर तालुक्यातील पार्डीताड व रिसोड तालुक्यातील मोठेगाव सरपंचपदासाठी कुणाचाही अर्ज न आल्याने दोन्ही ठिकाणी सरपंच पद रिक्त राहिले. मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड येथील सरपंच पदाच्या आरक्षित जागेसाठी दावेदार नसल्याने ती जागा रिक्त राहिली आहे. २६ ऑगस्टला १४ पैकी ११ गावात अविरोध तर ३ गावात सरपंच, उपसरपंच पदासाठी मतदान घेतले होते. उर्वरित ११ ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच पदासाठी ३0 ऑगस्टला मतदान घेण्यात आले. हिसई गावात सरपंच, उपसरपंच अविरोध झाले तर उर्वरित ठिकाणी मतदान घेण्यात आले. हिसई येथे सरपंचपदी कोकिळा सहदेव जाधव व उपसरपंच वंदना पंडित इंगोले यांची निवड झाली. तसेच पेडगाव येथे सरपंचपदी लता बाळू सुर्वे तर उपसरपंचपदी बाळू भिकाजी वैद्य यांच्या गळय़ात पडली. तर्हाळा येथे सरपंच लता मधुकर गावंडे व उपसरपंच वामन पांडुरंग चाबुकस्वार, पार्डी ताड येथे सरपंच पदासाठी आवश्यक आरक्षित जागा रिक्त राहल्याने तेथे केवळ उपसरपंच पदाकरिता निवडणुक घेण्यात आली यामध्ये उपसरपंच पदाची माळ ताईबाई मारोती गावंडे यांच्या गळय़ात पडली. येडशी येथे सरपंचपदी दयाराम अर्जुन चक्रनारायण व उपसरपंच शारदा गजानन सावंत, चोरद येथे सरपंच नाजूक नीळकंठ घुगे व उपसरपंच निर्मला उंकडा भोडणे, आदर्श ग्राम वनोजा येथे दिलीप शालीग्राम राऊत तर उपसरपंच प्रकाश किसन इंगोल, लावणा येथे खातुन बिराम परसुवाले सरपंच तर उपसरपंचपदी अशोक बाबुलाल गेडाम, मोहरी सरपंचपदी संजय केशवराव गावंडे तर उपसरपंचपदी संगीत पुडलीकराव इंगोले यांची निवड झाली आहे. निंबी ग्रामपंचायत सरपंचपद विशाखा ङ्म्रीकृष्ण मनवर व उपसरपंच नीता राजेश टोपले आणि फाळेगाव सरपंचपदी विद्या दिनेश व्यवहारे व उपसरपंचपदी ललिता प्रमोद मनवर यांची निवड झाली आहे.