४१ ग्रामपंचायतींमध्ये दोन-चार जागांसाठीच होणार मतदान !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 06:12 AM2021-01-08T06:12:37+5:302021-01-08T06:12:37+5:30
जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपल्याने निवडणूक होत आहे. ४ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर जिल्ह्यातील ११ ...
जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपल्याने निवडणूक होत आहे. ४ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर जिल्ह्यातील ११ ग्रामपंचायतींमधील सर्व सदस्य अविरोध झाले, तर ४१ ग्रामपंचायतींमधील जवळपास १८० जणांनी माघार घेतल्याने या ग्रामपंचायतींमध्ये दोन, चार जागांसाठी मतदान होत आहे. अधिकाधिक ग्रामपंचायती व सदस्य अविरोध व्हावे यासाठी यंदा लोकप्रतिनिधींसह स्थानिक पुढाऱ्यांनीदेखील प्रयत्न केले. यामध्ये काहींना यश आले तर काही ठिकाणी यश येऊ शकले नाही. ११ अविरोध ग्रामपंचायतींसह ५२ ग्रामपंचायतींमधील २५२ सदस्य अविरोध झाले आहेत. ४१ ग्रामपंचायतींमधील दोन, चार जागेसाठी लढती प्रतिष्ठेच्या झाल्याने येथे राजकारण ढवळून निघत असल्याचे दिसून येते.
०००
वाशिम तालुक्यात सर्वाधिक सदस्य अविरोध
वाशिम तालुक्यातील पाच अविरोध ग्रामपंचायतींसह १४ ग्रामपंचायतींमधील एकूण ६६ सदस्य अविरोध झाले आहेत. रिसोड तालुक्यातील ३२ ग्रामपंचायतमधील २२ सदस्य अविरोध झाले. मालेगाव तालुक्यात १४ ग्रामपंचायतींमधील ३७ सदस्य अविरोध झाले, तर दोन ग्रामपंचायती अविरोध झाल्या. मंगरूळपीर तालुक्यात ३५ सदस्य, मानोरा तालुक्यात ३३ सदस्य, कारंजा तालुक्यात २८ सदस्य अविरोध झाले.