कोरोनाची भीती असतानाही दिवाळीच्या काळात वाढले प्रदुषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 12:15 PM2020-11-20T12:15:09+5:302020-11-20T12:15:17+5:30
Pollution increased in Washim during Diwali फटाक्यांच्या धुरामधून, फटाक्यांच्या आवाजामुळे ध्वनी प्रदूषण माेठया प्रमाणात झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : वाशिम शहरामध्ये दिवाळीनिमित्त फटाक्यांच्या आतषबाजीमुळे माेठया प्रमाणात प्रदूषण वाढले असलले तरी याची मात्र प्रदूषण नियंत्रक मंडळाकडे नाेंद दिसून येत नाही. वाशिम शहरातील विविध भागात हवेची पातळी किती होती यासंदभार्त प्रदूषण नियंत्रक मंडळाकडे विचारणा केली असता वाशिममध्ये हवेची पातळी माेजण्यासंदभार्त यंत्रणाच नसल्याचे सांगण्यात आले.
काेराेनामुळे दिवाळीत फटाक्यांचे प्रमाण कमी राहणार तसेच प्रशासनाचेही फटाके न फाेडण्याचे आवाहन असल्याने यावेळी दिवाळीत दरवेळीपेक्षा फटाक्यांची आतिषबाजी कमीच झाली असली तरी लाखाे रुपयांची फटाके फाेडण्यात आली आहेत. या फटाक्यांच्या धुरामधून, फटाक्यांच्या आवाजामुळे ध्वनी प्रदूषण माेठया प्रमाणात झाले. परंतु शहरामध्ये प्रदूषणात किती वाढ झाली याची माहीती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता वाशिम शहरात अशी माेजणी सुविधाच नसल्याचे अमरावती प्रदूषण नियंत्रण अधिकारी संजय पाटील यांनी सांगितले.
प्रदुषणाचा शरिरावर काय परिणाम होतो
फटाक्यांच्या धुरामुळे आराेग्यावर माेठा परिणाम हाेताे. विशेषता कर्णबधिरता, त्वचाराेग, दमाचा त्रास जास्त हाेताे. रुग्णांनाही या प्रदूषणाचा त्रास हाेताे
- डाॅ. अनिल कावरखे
आराेग्य अधिकारी, जिसारु वाशिम