रमणा टेकडीवर पूजा-अर्चा; पावसासाठी वरूणराजाला साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:47 AM2021-08-17T04:47:37+5:302021-08-17T04:47:37+5:30
यंदा सुरुवातीला दमदार पाऊस झाला. त्यामुळे पीकपरिस्थिती उत्तम होती; मात्र २० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके जागीच करपून जात ...
यंदा सुरुवातीला दमदार पाऊस झाला. त्यामुळे पीकपरिस्थिती उत्तम होती; मात्र २० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके जागीच करपून जात असल्याचे विदारक चित्र निर्माण झाले आहे. विशेषत: सोयाबीन, तूर, मूग, उडीद या पिकांना जबर फटका बसत आहे. ज्यांच्याकडे पाण्याची सुविधा आहे, त्यांनी स्प्रिंकलरच्या माध्यमातून पिके जगविण्याची धडपड चालविली आहे; मात्र ज्यांच्याकडे पाणी नाही, त्यांच्यासमोर बिकट संकट उभे ठाकले आहे. दरम्यान, पवित्र समजल्या जाणाऱ्या श्रावण महिन्यात योग साधून अनिल गरकळ, राष्ट्रवादीच्या महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष तारामती जायभाये, हभप दिनकर जायभाये, प्रभाकर चोपडे, नारायण चोपडे, गजानन कोरकाने, प्रल्हाद चोपडे, गजानन काळे, रंगनाथ सानप, माणिक गरकळ, नंदू ठाकूर, दत्ता चोपडे, रूस्तूम चोपडे, शंकर चोपडे, अशोक काळदाते, दत्ता काळदाते, अभय काळदाते, रवी गिते यांच्यासह असंख्य महिलांनी रमणा टेकडी चढून त्याठिकाणी पूजा-अर्चा करून वरूणराजाला साकडे घातले. याप्रसंगी भजनाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता.