वाशिम शहरातील माहूरवेशीची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:27 AM2021-06-26T04:27:49+5:302021-06-26T04:27:49+5:30
महामार्गाच्या कामाला गती देण्याची मागणी वाशिम : वाशिमवरून मालेगावकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम संथ गतीने सुरू असून, वाहतूक विस्कळीत ...
महामार्गाच्या कामाला गती देण्याची मागणी
वाशिम : वाशिमवरून मालेगावकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम संथ गतीने सुरू असून, वाहतूक विस्कळीत होत आहे. ही बाब लक्षात घेऊन महामार्गाच्या कामाला गती देण्याची मागणी वाशिम ते मालेगाव रस्त्यावर वसलेल्या ग्रामीण भागातून होत आहे.
नुकसान भरपाई देण्याची मागणी
वाशिम : १९ मार्च, २०२० रोजी अवकाळी पाऊस व गारपीट झाली. त्यात बिजवाई कांद्याचे प्रचंड नुकसान झाले. असे असताना, शासनाकडून अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही. शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
अंतर्गत रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी
वाशिम : शहरातील विविध ठिकाणच्या अंतर्गत रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. स्थानिक नगरपरिषदेने हा प्रश्न गांभीर्याने घेऊन रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने निवेदनाद्वारे केली.
प्रवाशांनी खबरदारी बाळगण्याचे आवाहन
वाशिम : खासगी वाहनांद्वारे ग्रामीण भागात प्रवास करीत असलेले अनेक जण खबरदारी बाळगत नसल्याचे दिसत आहे. यामुळे कोरोनाची लागण होऊ शकते. ही बाब लक्षात घेता, खबरदारी बाळगण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
पॅसेंजर रेल्वे सुरू करण्याची मागणी
जऊळका रेल्वे : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लावलेल्या निर्बंधांतून शिथिलता मिळाल्यानंतर एक्स्प्रेस रेल्वे सुरू झाली. मात्र, जऊळका रेल्वे स्थानकावर ही रेल्वे थांबत नाही. त्यामुळे पॅसेंजर सुरू करावी, अशी मागणी होत आहे.
प्रमुख चौकांमधून अवैध वाहतूक
वाशिम : शहरातील मुख्य चौकांमधून दैनंदिन अवैध वाहतूक सुरू आहे. वाहनांमध्ये प्रवाशांना अक्षरश: कोंबून हा प्रकार सुरू असल्याचे दिसत आहे. याकडे संबंधितांनी लक्ष द्यावे.
अवैध प्रवाशी वाहतूक जोरात
वाशिम : किन्हीराजा येथून मालेगाव व कारंजाकडे अवैध प्रवाशी वाहतूक करणारी वाहने धावत आहेत. हा प्रकार सध्या जोरासोरात सुरू आहे. एसटी फेऱ्यांची संख्या कमी असल्याने, हा प्रकार उद्भवल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रारी झाल्या. मात्र, त्याचा काही फायदा झाला नाही.