मोप ते बोरखेडी रस्त्याची दयनीय अवस्था !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:54 AM2021-06-16T04:54:23+5:302021-06-16T04:54:23+5:30
मोप-बोरखेडी रस्त्यावर सर्वत्र चिखल झाला आहे. या रस्त्यावरून वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागत असून, पायी चालणेही कठीण आहे. ...
मोप-बोरखेडी रस्त्यावर सर्वत्र चिखल झाला आहे. या रस्त्यावरून वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागत असून, पायी चालणेही कठीण आहे. बोरखेडी गावाची ओळख ही विविध कंपन्याचे बिजवाई निर्मिती करणारे गाव म्हणून बुलडाणा, वाशिम जिल्ह्यांमध्ये नावलौकिक मिळविलेले गाव आहे. परंतु, या गावाच्या विकासाबाबत लोकप्रतिनिधी उदासिन आहेत. मोप ते कन्हेरी बोरखेडी या रस्त्याची अवस्था गंभीर असल्याने शेतकऱ्यांना शेतमाल बाजारपेठेत नेण्यात अडचणी येतात, तर या गावासाठी एसटी महामंडळाची बससेवाही नाही. ग्रामस्थांनी अनेक लोकप्रतिनिधींकडे या रस्त्याच्या निर्मितीसाठी निवेदने दिली. परंतु अद्याप कुठल्याच लोकप्रतिनिधीला मोप, कन्हेरी, बोरखेडी रस्त्याकडे लक्ष देण्याला वेळ मिळाला नाही. त्यामुळे ग्रामस्थांकडून लोकप्रतिनिधीबाबत रोष व्यक्त होत आहे.
---------------
कोट : बोरखेडी ते मोप रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट आहे. या रस्त्यावर सर्वत्र खड्डेच खड्डे आहेत. या रस्त्यासंदर्भात काही लोकप्रतिनिधी राजकारण करीत आहेत. या राजकारणामुळे रस्त्याचे काम रखडल्याने आम्हांला त्रास सहन करावा लागत आहे.
-सुनील नागरे (ग्रामस्थ बोरखेडी)