मालेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात पाणंद रस्त्यांची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:37 AM2021-07-26T04:37:43+5:302021-07-26T04:37:43+5:30

महाराष्ट्र शासनाच्या कायद्यानुसार शेतीसाठी लागणाऱ्या रस्त्यासंदर्भात काही अटी व नियम ठरवून देण्यात आले आहेत. याबाबतचे सर्व अधिकार महसूल ...

Poor condition of Panand roads in rural areas of Malegaon taluka | मालेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात पाणंद रस्त्यांची दुरवस्था

मालेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात पाणंद रस्त्यांची दुरवस्था

Next

महाराष्ट्र शासनाच्या कायद्यानुसार शेतीसाठी लागणाऱ्या रस्त्यासंदर्भात काही अटी व नियम ठरवून देण्यात आले आहेत. याबाबतचे सर्व अधिकार महसूल खात्यांच्या अधिकाऱ्यांकडे दिलेले आहेत. मात्र, अधिकारी शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याबाबत उदासीन आहेत. पाणंद रस्ता ही शेतीसाठी सर्वात महत्त्वाची बाब आहे. कुठल्याही हंगामात शेतकऱ्यांना साहित्य, अवजारांची नेआण करण्यासह वहिवाटीसाठी हक्काचा रस्ता असणे आवश्यक आहे. त्यात मालेगाव तालुक्यातील ९५ टक्के कुटुंब शेती व्यवसायावर निर्भर आहेत. शेतीवरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो, मात्र मोठा कालावधी उलटूनही शेतीपर्यंत पोहोचण्यासाठी योग्य असे पाणंद रस्ते शेतकऱ्यांना नाहीत. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी त्रस्त असून, पाणंद रस्त्याविना शेती करावी तरी कशी, असा प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित केला जात आहे.

--------

पाणंद रस्त्यांना दलदलीचे रूप

मालेगाव तालुक्यात पाणंद रस्त्यांची कामे अद्याप झालेली नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात या रस्त्यांना दलदलीचे रूप प्राप्त होते आणि शेतकऱ्यांना गुडघाभर चिखल तुडवत जावे लागते. या रस्त्यांवर वाहने चालविणे अशक्य असून, बैलगाडी तर चिखलातच रुतून बसते. त्यामुळे विविध कामांसाठी आवश्यक साहित्याची डोक्यावरून ने-आण करावी लागते. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत, मात्र याकडे कुणीही गांभीर्याने लक्ष देण्यास तयार नाही.

250721\img-20210725-wa0061.jpg

पांदण रस्ते

Web Title: Poor condition of Panand roads in rural areas of Malegaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.