पांदन रस्त्याची दुरवस्था शेतकरी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:42 AM2021-07-27T04:42:46+5:302021-07-27T04:42:46+5:30

शेतातील उत्पादित माल व शेताकडे जाण्यासाठी शेतकऱ्यांना सोयीचे होईल, याकरिता पांदण रस्त्यांचा उपयोग होतो. दगड उमरा येथील पांदन रस्त्याकडे ...

Poor condition of Pandan road afflicts farmers | पांदन रस्त्याची दुरवस्था शेतकरी त्रस्त

पांदन रस्त्याची दुरवस्था शेतकरी त्रस्त

Next

शेतातील उत्पादित माल व शेताकडे जाण्यासाठी शेतकऱ्यांना सोयीचे होईल, याकरिता पांदण रस्त्यांचा उपयोग होतो. दगड उमरा येथील पांदन रस्त्याकडे गट ग्रामपंचायत शेलगाव घुगे अंतर्गत दगड उमरा येथील काही गावानजीकचे रस्ते अतिक्रमणाने गिळंकृत केले आहेत. हे रस्ते पायवाट म्हणून अजूनही वापरले जात आहेत. फाळेगाव थेट शिवारात जाणाऱ्या पांदण रस्त्यावर मोठमोठे खड्डे, मोठमोठे खडक असून, पाण्याच्या डबक्यातून शेतकऱ्यांना वाट काढावी लागत आहे. पावसाळ्यात पांदण रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली असून, पांदण रस्त्याच्या दुरुस्तीकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. दगड उमरा येथील पांदन रस्त्याची मुरुम टाकून नूतनीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. न केल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांकडून दिला जात आहे.

----------------------------------------

आम्हाला शेतात शेतीविषयक अवजारे, बैलगाडी, शेतीतील माल ने आण करताना खूप त्रास सहन करावा लागत आहे, तरी याकडे शासनाने संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देऊन शेतकऱ्यांचा त्रास कमी करावा.

- भागवत माधव पाठे, शेतकरी.

Web Title: Poor condition of Pandan road afflicts farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.