रिसोड ते शेगाव खोडके रस्त्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:27 AM2021-07-21T04:27:10+5:302021-07-21T04:27:10+5:30

हा रस्ता मराठवाड्याच्या सीमेला जोडला जात असून, या रस्त्यावर रिसोड शहरातील माणुसकीनगर ते पवारवाडी हा रस्ता संपूर्णपणे चिखलमय झाला ...

Poor condition of Risod to Shegaon Khodke road | रिसोड ते शेगाव खोडके रस्त्याची दुरवस्था

रिसोड ते शेगाव खोडके रस्त्याची दुरवस्था

googlenewsNext

हा रस्ता मराठवाड्याच्या सीमेला जोडला जात असून, या रस्त्यावर रिसोड शहरातील माणुसकीनगर ते पवारवाडी हा रस्ता संपूर्णपणे चिखलमय झाला आहे . या रस्त्यावर रिसोड शहरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी असून, त्यांना रोज याच रस्त्याने आपल्या शेतात जावे लागते. पावसाळ्यात शेतीकामांसाठी अनेक महिलांना याच रस्त्यावरून शेतात जावे लागते. या रस्त्यावर अनेक अपघात झाले आहेत. या रस्त्यावर चालताना शेतकऱ्यांना मोटारसायकल हातात धरून काही अंतर पार करावे लागते, तर महिलांना शेतात जाण्यासाठी पायातील चपला हातात घेऊनच हा रस्ता पार करावा लागतो. मराठवाड्याच्या शेगाव खोडकेपासून हा रस्ता चांगला आहे; परंतु रिसोड तालुक्यातील पवारवाडी गावापर्यंत हा रस्ता चिखलमय झाला आहे. त्यामुळे संबंधित रस्ता त्वरित दुरुस्त करून शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासापासून वाचविण्याची मागणी समाजसेवक तथा शेतकरी गोपाल गायकवाड यांनी केली आहे.

Web Title: Poor condition of Risod to Shegaon Khodke road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.