सोहमनाथ महाराज मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:54 AM2021-06-16T04:54:07+5:302021-06-16T04:54:07+5:30
या घाण पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून याकडे ग्रां.प. प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. आसोला खुर्द या गावाची ...
या घाण पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून याकडे ग्रां.प. प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. आसोला खुर्द या गावाची लोकसंख्या ७ हजाराच्या जवळपास आहे. या ठिकाणी श्री सोहमनाथ महाराजांचे भव्य मंदिर आहे. या मंदिरावर भाविक भक्त व गावातील नागरिकांना ये-जा करण्याकरिता मुख्य रस्ता असल्याने खूप कसरत करावी लागत आहे. ग्रामस्थांना मूलभूत सुविधा पुरविण्यात ग्रामपंचायत अपयशी ठरत आहे. दांडीबाज ग्रामसेवक अनियमित असल्याने गावातील समस्या अनेक दिवसांपासून जैसे थे आहे. तरी या मंदिराच्या रस्त्यावर साचलेले घाण पाणी तसेच रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे त्यामध्ये नेहमीच घाण पाणी साचून राहते आणि त्या पाण्यामुळे येणाऱ्या भाविकांना नाक बंद करून यावे लागत आहे.
तरी या गावात स्वतः गट विकास अधिकारी यांनी लक्ष देऊन गावाचा विकास करावा, अशी मागणी गावातील ग्रामस्थांनी केली आहे.