पावसामुळे रस्त्याची दुरवस्था ; ग्रामस्थांना अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:43 AM2021-07-28T04:43:20+5:302021-07-28T04:43:20+5:30

कोंडोली येथील लोकसंख्या अडीच हजारांच्या वर असल्याने कोंडोली येथे अनेक वर्षांपासून आरोग्य उपकेंद्र आणि पशुवैद्यकीय दवाखाना सुरू करण्यात आला ...

Poor condition of roads due to rains; Difficulties to the villagers | पावसामुळे रस्त्याची दुरवस्था ; ग्रामस्थांना अडचणी

पावसामुळे रस्त्याची दुरवस्था ; ग्रामस्थांना अडचणी

Next

कोंडोली येथील लोकसंख्या अडीच हजारांच्या वर असल्याने कोंडोली येथे अनेक वर्षांपासून आरोग्य उपकेंद्र आणि पशुवैद्यकीय दवाखाना सुरू करण्यात आला आहे, या दोन्ही दवाखान्याकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे आजारी गुरांसह आरोग्य केंद्रात जाणाऱ्या रुग्णांचे हाल होत आहेत. यात लहान बाळांचे लसीकरण, गरोदर मातांची तपासणी, प्रसूतीसाठी रुग्णाला नेताना मोठी अडचण निर्माण होते. त्यामुळे संबंधितांनी लक्ष देऊन या रस्त्याची डागडुजी त्वरित करावी, अशी मागणी जोर धरत आहे . दोन्ही दवाखाने जवळ जवळ आहेत. विशेष म्हणजे ज्या रस्त्याने दोन्ही दवाखाने जवळ पडतात. त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी दलित वस्ती आणि बंजारा वस्ती असतानाही अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. दलित वस्ती सुधार योजना, तांडा वस्ती सुधार योजना अशा योजना असूनही या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत संबंधित प्रशासन उदासीन असल्याने ग्रामस्थांत रोषाचे वातावरण आहे.

Web Title: Poor condition of roads due to rains; Difficulties to the villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.