वसारी-तिवळी रस्त्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:51 AM2021-07-07T04:51:14+5:302021-07-07T04:51:14+5:30

^^^^^^^^^^ जि.प. शाळांच्या वर्गखोल्या नादुरुस्तच वाशिम : कोरोना संसर्गामुळे यंदाही शाळा भरणार नाहीत. त्यामुळे यंदाच्या सत्रापूर्वी वर्गखोल्यांची दुरुस्ती तातडीने ...

Poor condition of Vasari-Tiwali road | वसारी-तिवळी रस्त्याची दुरवस्था

वसारी-तिवळी रस्त्याची दुरवस्था

Next

^^^^^^^^^^

जि.प. शाळांच्या वर्गखोल्या नादुरुस्तच

वाशिम : कोरोना संसर्गामुळे यंदाही शाळा भरणार नाहीत. त्यामुळे यंदाच्या सत्रापूर्वी वर्गखोल्यांची दुरुस्ती तातडीने करून विद्यार्थ्यांची संभाव्य गैरसोय टाळावी, अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे. तथापि, अनेक शाळांच्या वर्गखोल्यांसाठी निधी मिळूनही दुरुस्तीचे काम झाले नाही.

---------

अपुऱ्या संख्येमुळे पोलिसांवर अतिरिक्त ताण

वाशिम : येथील पोलीस चौकीअंतर्गत परिसरातील १५ पेक्षा अधिक गावांचा समावेश आहे. या गावांतील जनतेच्या सुरक्षेसाठी मात्र आवश्यक संख्येत पोलीस कर्मचारी नाहीत. त्यामुळे कामरगाव चौकीत कार्यरत पोलीस कर्मचा-यांवर कायदा-सुव्यवस्था अबाधित राखताना ताण येत आहे.

----------

आरोग्य केंद्राकडून ग्रामस्थांना मार्गदर्शन

वाशिम : आरोग्य पोषण व समुपदेशन कार्यक्रमांतर्गत दगड उमरा परिसरात प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या वतीने कोरोना संसर्गाच्या पृष्ठभूमीवर शनिवारी ग्रामस्थांना आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले. गेल्या आठवडाभरापासून हा उपक्रम सुरू आहे.

------

रोहित्राची दुरुस्ती करण्याची मागणी

वाशिम : रिसोड तालुक्यातील महागाव येथील रोहित्र गेल्या आठवडाभरापासून नादुरुस्त आहे. त्यामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने अर्धे गाव त्रस्त झाले आहे. हे रोहित्र बदलण्याची किंवा तातडीने दुरुस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी सोमवारी केली.

--------

पीक संरक्षणासाठी बांधबंदिस्तीची कामे

वाशिम : कामरगाव परिसरात उगवलेल्या पिकांवर वन्यप्राणी ताव मारून पिकांचे नुकसान करीत असल्याने शेतक-यांनी बांधबंदिस्तीच्या कामाला वेग दिल्याचे चित्र सोमवारी दिसून आले. उगवलेल्या पिकांवर वन्यप्राणी ताव मारत असल्याने शेतकरी वैतागून गेले आहेत.

---------

Web Title: Poor condition of Vasari-Tiwali road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.