विद्युत पुरवठय़ाअभावी खरिपावर ओढवले संकट!
By admin | Published: September 4, 2015 01:30 AM2015-09-04T01:30:10+5:302015-09-04T01:30:10+5:30
बळीराजा हतबल; विविध प्रकारच्या किडींचाही पिकांवर विपरीत परिणाम.
वाशिम : पावसातील अनियमिततेमुळे यावर्षी खरीप हंगामातील सर्वच पिके बाधित झाली आहेत. असे असताना ज्या शेतकर्यांकडे सिंचनाची सोय आहे, त्यांना पुरेशी वीज मिळणे दुरापास्त झाले असून, विविध प्रकारच्या किडींमुळेही पिके नेस्तनाबूत होत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. जिल्ह्यात यंदा ४ लाख ७ हजार ९७ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. सर्वाधिक पेरा सोयाबीनचा २ लाख ९0 हजार ९१ हेक्टरवर आहे. कपाशी ३0 हजार ८५७ हेक्टर, ज्वारी ८ हजार १९५ हेक्टर, तूर ५३ हजार ३९७ हेक्टर, मूग ११ हजार ६३७ हेक्टर, उडीद ११ हजार ८३२ हेक्टर असा खरिपातील प्रमुख पिकांचा पेरा आहे. यावर्षी मृग नक्षत्रातच पेरणीलायक झालेल्या पावसाने जुलै महिन्यात मात्र दडी मारली. त्यामुळे मूग, उडीद या पिकांना मोठा फटका बसला. जिल्ह्यातील काही शेतकर्यांकडे सिंचनाची सोय असल्याने ते ह्यस्प्रिंकलरह्णद्वारे पाणी देऊन पिके जगविण्याची केविलवाणी धडपड करीत आहेत; मात्र सलग ुवीजपुरवठा मिळणे कठीण झाल्याने शेतकर्यांचा हा प्रयोगही फसला आहे. अनेक शेतकर्यांनी शेतात जाणे सोडून दिले आहे. अनेक शेतात सोयाबीन डौलदार उभे दिसून येत असले तरी शेंगा न धरल्याने शेतकर्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पाणी आहे, विद्युत पुरवठा आहे पण विद्युतपुरवठा नियमित राहत नसल्याने शेतकर्यांची गत ह्यचणे आहेत, पण दात नाहीह्ण अशी झाली आहे.