मुख्यमंत्र्यांकडे पाठविल्या तुरीच्या घुगऱ्या!
By admin | Published: June 16, 2017 07:45 PM2017-06-16T19:45:50+5:302017-06-16T19:45:50+5:30
वाशिम : येथील शेतकºयांनी १४ जून रोजी घुगºया शिजवून आगळे वेगळे आंदोलन केले. दरम्यान, शुक्रवारी शेतकºयांनी या घुगºया प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पॅक करून मुख्यमंत्र्यांना पाठविल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : ३१ मे पर्यंत टोकन मिळालेल्या हजारो शेतकऱ्यांची लाखो क्विंटल तूर १० जूनपासून खरेदी करणे बंद करण्यात आले. ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर शासनाने अंगिकारलेल्या या धोरणाचा निषेध म्हणून १४ जून रोजी वाशिममध्ये शेतकऱ्यांनी तूरीच्या घुगऱ्या शिजविण्याचे आगळेवेगळे आंदोलन केले. दरम्यान, १६ जून रोजी ह्या घुगऱ्या प्लास्टिक थैलीत पॅक करून मुख्यमंत्र्यांकडे देखील पाठविण्यात आल्या.
वाशिम जिल्ह्यात दरवर्षीच्या तुलनेत गतवर्षीच्या रब्बी हंगामात तुरीचे विक्रमी उत्पादन झाले. फेब्रूवारीपासून नाफेडमार्फत ५०५० रुपये प्रतिक्विंटल हमीदराने तूर खरेदी प्रक्रिया सुरू झाली. मात्र, अधूनमधून या ना त्या कारणांनी खरेदी बंद करणे, गोदामांमध्ये जागा नसणे, बारदाना टंचाई, तुरीचे चुकारे प्रलंबित ठेवणे, आदी कारणांमुळे शेतकरी मेटाकुटीस आले. अशातच ३१ मे पर्यंत जिल्ह्यातील नाफेडच्या पाच खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांना टोकन देण्यात आले. मात्र, तूर खरेदी करण्यात आली नाही. परिणामी, लाखो क्विंटल तूर शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. या धोरणाच्या निषेधार्थ वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजू चौधरी यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी तुरीच्या घुगऱ्या शिजवून त्या वाटप करण्याचे आंदोलन राबविले. शिजविलेल्या या घुगऱ्या मुख्यमंत्र्यांच्या नावे पत्र लिहून त्यांच्याकडे १६ जून रोजी पाठविण्यात आल्या.