कर्जमुक्ती योजनेचे पोर्टल ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2020 06:07 PM2020-03-02T18:07:54+5:302020-03-02T18:08:18+5:30
सोमवार २ मार्च रोजी प्रमाणिकरणासाठी शेंदुरजना येथील आपले सरकार केंद्र व जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत शेकडो शेतकरी ताटकळत बसले होते
शेंदुरजना आढाव (वाशिम): महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचे पोर्टल ठप्प झाल्यामुळे कर्जमुक्ती मिळालेल्या लाभार्थींना आपले आधार क्रमांक आणि इतर माहिती भरून प्रमाणिकरण करून घेण्यात अडचणी येत आहेत. सोमवार २ मार्च रोजी प्रमाणिकरणासाठी शेंदुरजना येथील आपले सरकार केंद्र व जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत शेकडो शेतकरी ताटकळत बसले होते.
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत विविध अडचणींमुळे शेतकरीवर्ग त्रस्त झाला असताना या योजनेच्या लाभार्थींची पहिली यादी ग्रामपंचायत कार्यालय, आपले सरकार सेवा केंद्रांत झळकल्यानंतर शेतकºयांना दिलासा मिळाला आणि या योजनेंतर्गत आधार प्रमाणिकरणासह इतर माहिती भरण्यासाठी शेतकºयांची लगबग सुुरु झाली; परंतु शेंदुरजना येथे या प्रक्रियेसाठी शेकडो शेतकरी दाखल झाले असताना योजनेचे पोर्टल ठप्प झाल्याने शेतकºयांना दिवसभर आपले सरकार सेवा केंद्रासह बँकेच्या शाखेत ताटकळत बसावे लागले. पोर्टल ठप्प असल्याने शेतकºयांसह आपले सरकार केंद्रातील संगणक चालक आणि बँकेच्या कर्मचाºयांनाही अडचणींचा सामना करावा लागला. दरम्यान, शेंदुरजना येथे ग्रामपंचायत कार्यालय परिसरात जिल्हा व तहसील प्रशासनासह जिल्हा मध्यवर्ती बँक शेंदुरजना (अ) च्या शाखेकडून शेतकºयांचे आधार क्रमांक प्रामाणिकरण करण्यासाठी विशेष शिबिराचेही आयोजन केले; परंतु पोर्टल ठप्प असल्याने त्याचा काहीच फायदा झाला नाही.