पुलाच्या नाल्यात कचरा अडकल्याने अपघाताची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:31 AM2021-07-17T04:31:15+5:302021-07-17T04:31:15+5:30
उंबर्डा बाजार-वहितखेड ते जांब-कारंजा या मार्गादरम्यानच्या पुलामधील नाल्यांत मोठ्या प्रमाणात काडी- कचरा अडकला आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात पुलावर ...
उंबर्डा बाजार-वहितखेड ते जांब-कारंजा या मार्गादरम्यानच्या पुलामधील नाल्यांत मोठ्या प्रमाणात काडी- कचरा अडकला आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात पुलावर गाळ साचत असल्याने वाहने घसरून अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.
उंबर्डा बाजार-वहितखेड ते जांब-कारंजा हा मार्ग देखभालीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येतो. विशेष कारंजा जाण्यासाठी कमी अंतराचा मार्ग असल्याने या मार्गांवर दुचाकीसह चारचाकी वाहनांची दिवस-रात्र वर्दळ सुरू असते. या मार्गांवर उंबर्डा बाजार ते वहितखेड यादरम्यान चार छोटेखानी पूल असून, जांब ते कारंजा यादरम्यान तीन मिळून एकूण सात पूल आहेत. यातील बहुतांश पुलांमध्ये पाणी वाहून जाण्यासाठी सिमेंट पाइपचा वापर असल्याने अनेक पुलांच्या पाइपमध्ये मोठ्या प्रमाणात काडी-कचरा अडकल्याने पावसाळ्यात अनेक पुलांवरून पाणी वाहते. त्यामुळे पुलावर चिखल निर्माण होत असल्याने दुचाकी घसरून अपघाताची भीती आहे.