‘लाल्या’मुळे कपाशी उत्पादनात घट होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 01:20 PM2018-10-23T13:20:51+5:302018-10-23T13:21:10+5:30

वाशिम : बोंडअळीमुळे कपाशीचे आधिच नुकसान झाले असताना आता या पिकावर लाल्या रोगाचा प्रादूर्भाव होत आहे , यामुळे उत्पादनात आणखी घट होणार असल्याची शक्यता असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. 

The possibility of reduction in crop production due to the diesease | ‘लाल्या’मुळे कपाशी उत्पादनात घट होण्याची शक्यता

‘लाल्या’मुळे कपाशी उत्पादनात घट होण्याची शक्यता

Next

वाशिम : बोंडअळीमुळे कपाशीचे आधिच नुकसान झाले असताना आता या पिकावर लाल्या रोगाचा प्रादूर्भाव होत आहे , यामुळे उत्पादनात आणखी घट होणार असल्याची शक्यता असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. 
कृषी विभागाकडून पिकांची पाहणी सुरु झाली आहे. कृषी विभागाने शेतकºयांना नुकसानापासून वाचविण्यासाठी योग्य  मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून होत आहे. जिल्हयात गतवर्षी कपाशीवर बोंडअळींचा मोठया प्रमाणात प्रादूर्भाव झाल्याने शेतकºयांनी यंदा या पिकाकडे पाठ फिरविल्याचे यावर्षी झालेल्या पेºयावरुन दिसून येते. गतवर्षी ३१ हजार हेक्टरवर असलेले कपाशीचे क्षेत्र यंदा १८ हजार ६०० हेक्टरपर्यंत मर्यादित झाले आहे. कृषी विभागाने यंदा कपाशीला बोंडअळीपासून वाचविण्यासाठी पेरणी काळापासूनच शेतकºयांना मार्गदर्शन केले.  तरी कपाशीवर बोंडअळीचा प्रादूर्भव झाला आणि कपाशीचे पीक यंदाही हातचे जाण्याची भिती वाढली होती. दरम्यान आॅगस्टमध्ये जोरदार पाऊस आल्याने या किडीला अटकाव झाला. परंतु परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्याने कपाशी पिक संकटात सापडले. कोरडवाहू शेतजमिनीला तडा पडू लागल्या दिवसाच्या आणि रात्रीच्या वातावरणात विषमता निर्माण झाली. आणि मुळाव्दारे घटकद्रव्ये शोषण्याची कपाशीची क्षमता कमी होत गेल्याने  या पिकावर आता लाल्याचा प्रकोप होत असल्याचे चित्र आहे. कपाशीच्या पेरणीला दीड महिना झाला असून आता पुढे पुन्हा एवढाच कालावधी या पिकाला लाल्या रोगाचा धोका कायम राहणार आहे.  त्यातच हलक्याप्रतिच्या शेतजमिनीवरील कपाशीत या रोगाचे प्रमाण अधिक असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. या रोगाचा उत्पादनावर मोठा परिणाम होणार असल्याचे दिसून येत आहे.


वातावरणातील बदलामुळे कपाशीवर लाल्याचा प्रादूर्भाव होत आहे. या पृष्ठभूमिवर कृषी विभागाने कपाशीची पाहणी सुरु केली असून या रोगावर नियंत्रणासाठी शेतकºयांनी दोन ओळींच्या अंतराने पाणी द्यावे, तसेच नत्राचे प्रमाण कमी झाल्याचे वाटत असल्यास ते वाढविण्याचा प्रयतन करावा आणि एक टक्का मॅग्नेशिअम सल्फेट व दोन टक्के डिएपीची पिकावर फवारणी करावी असे आवाहन कृषी विभागाचेवतिने करण्यात आले आहे.

Web Title: The possibility of reduction in crop production due to the diesease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.