भारतीय धनुर्विद्या संघात श्रीरंगची निवड होण्याची शक्यता!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 01:22 AM2018-03-13T01:22:59+5:302018-03-13T01:23:14+5:30
अकोला : कारंजा लाड येथील श्रीरंग सावरकर याची निवड धनुर्विद्या या क्रीडा प्रकारात आशियाई खेल-२०१८ व पहिल्या वर्ल्डकप चायना व दुसºया वर्ल्डकप तुर्की या तिन्ही आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या निवड चाचणीकरिता झाली आहे. निवड चाचणी सोनिपत येथील स्पोर्ट आॅथुरेटी आॅफ इंडियाच्या मैदानावर १५ ते १८ मार्च या कालावधीत होणार आहे. या निवड चाचणीमधून भारतीय संघ निवडल्या जाणार आहे.निवड चाचणीमध्ये वाशिम जिल्ह्यामधून कंपाउंड राउंड प्रवेश प्राप्त करणारा श्रीरंग हा पहिला खेळाडू ठरला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कारंजा लाड येथील श्रीरंग सावरकर याची निवड धनुर्विद्या या क्रीडा प्रकारात आशियाई खेल-२०१८ व पहिल्या वर्ल्डकप चायना व दुस-या वर्ल्डकप तुर्की या तिन्ही आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या निवड चाचणीकरिता झाली आहे. निवड चाचणी सोनिपत येथील स्पोर्ट आॅथुरेटी आॅफ इंडियाच्या मैदानावर १५ ते १८ मार्च या कालावधीत होणार आहे. या निवड चाचणीमधून भारतीय संघ निवडल्या जाणार आहे. निवड चाचणीमध्ये वाशिम जिल्ह्यामधून कंपाउंड राउंड प्रवेश प्राप्त करणारा श्रीरंग हा पहिला खेळाडू ठरला आहे.
श्रीरंग हा धनुर्विद्येतील कंपाउंड राउंड प्रकाराचा नियमित सराव कारंजा क्रीडा संकूल येथे करीत आहे. जिल्हा गुणवंत खेळाडू, विदर्भ क्रीडा रत्नाने सन्मानित व शंभरहून अधिक पदके प्राप्त असणाºया श्रीरंगने आतापर्यंत बºयाच राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके मिळविली. श्रीरंग हा ग्रामीण भागातील खेळाडू असून, असाध्य आजाराशी लढत स्वबळावर त्याने एवढे यश मिळविले आहे. धनुर्विद्या सरावाकरिता सुविधा मिळविण्यासाठी कित्येकदा त्याने आपल्या जिल्ह्यातील आमदार, खासदार, जिल्हा क्रीडा अधिकारी, पालक मंत्री, जिल्हाधिकाºयांना त्याने योग्य साहित्य मागण्यासाठी अर्ज दिले. परंतु, त्याचा काही उपयोग अजूनही झाला नाही, असे श्रीरंगचे वडील बाळासाहेब सावरकर यांनी म्हटले. श्रीरंगला अंचित आहुजा ट्रस्टच्या संचालिका पूजा आहुजा, आई जयश्री सावरकर, वडील बाळासाहेब सावरकर, महाराष्ट्र आर्चरीचे सचिव प्रमोद चांदूरकर, अध्यक्ष प्रशांत देशपांडे, ब्रेन ट्युमर फाउंडेशन आॅफ इंडियाचे अध्यक्ष डॉक्टर जलाली, डॉक्टर रहीस व वाशिम जिल्हा धनुर्विद्या संघटनेचे अध्यक्ष वानखड,े सचिव थडकर, दंभारे, बाळसाहेब पौड, अजय बोंडे यांचे वेळोवेळी प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभते.
‘‘धनुर्विद्या या खेळाचे कोणतेही साहित्य हे वाशिम जिल्हा क्रीडा संकुलाकडून आजपर्यंत कारंजा तालुका क्रीडा संकु लला मिळालेले नाही. कित्येकदा उच्च प्रतीच्या साहित्याची मागणी केली असता फक्त आश्वासने देण्यात आली. ’’
- श्रीरंग सावरकर,धनुर्विद्यापटू