कारंजा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यासह शहर ठाणेदाराचे पद रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:46 AM2021-08-12T04:46:48+5:302021-08-12T04:46:48+5:30
कारंजा येथे स्वतंत्र एसडीपीओ व ठाणेदार नसल्याने अनेक प्रकरणांच्या तपासकार्यात अडचणी येत असून शहरात कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करणे ...
कारंजा येथे स्वतंत्र एसडीपीओ व ठाणेदार नसल्याने अनेक प्रकरणांच्या तपासकार्यात अडचणी येत असून शहरात कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करणे कठीण झाले आहे. कारंजाचे पोलीस उपविभागीय अधिकारी संजय पाटील यांच्या बदलीनंतर २० जानेवारी रोजी अशोक चैाधरी यांची कारंजाचे पोलीस उपविभागीय अधिकारी म्हणून वर्णी लागली. त्यानंतर केवळ ११ दिवसांनंतरच ते सेवानिवृत्त झाल्याने ते कारंजात केवळ ११ दिवसच कर्तव्यात हाेते. ३१ जानेवारीपासून तर आजपर्यंत गेल्या सात महिन्यांपासून कारंजा उपविभागीय पोलीस अधिकारीपदी कोणाचीच नियुक्ती न झाल्याने सात महिन्यांपासून हे पद रिक्त आहे. त्यामुळे कारंजा उपविभागीय पोलीस अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार धनज पोस्टेचे ठाणेदार अनील ठाकरे यांच्याकडे देण्यात आला. तसेच २३ जूनला अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक अनुराग पांडे यांनी कारंजा येथील अवैध धंद्यांवर मोठी कारवाई करण्यात आल्याने कारंजा शहर पोस्टेचे तत्कालीन ठाणेदार सतीश पाटील यांना बडतर्फ करण्यात आले. त्यामुळे २४ जूनपासून हा भार ग्रामीण पाेलीस स्टेशन ठाणेदारांवर देण्यात आला आहे.