मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेचे परिपूर्ण अर्ज आमंत्रित !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 04:20 PM2018-07-06T16:20:14+5:302018-07-06T16:21:10+5:30

वाशिम : सन २०१७-१८ मध्ये केंद्र व राज्य पुरस्कृत वि.जा.भ.ज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज आॅफलाईन पध्द्तीने व नूतनीकरणाचे विद्यार्थ्यांचे अर्ज सामाजिक न्याय विभागाच्या जुन्या प्रणालीवरुन सादर करावे लागणार आहेत.

Post-Matric Scholarship scheme invites complete application! | मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेचे परिपूर्ण अर्ज आमंत्रित !

मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेचे परिपूर्ण अर्ज आमंत्रित !

googlenewsNext
ठळक मुद्दे २०१७-१८ मधील प्रस्ताव विहित प्रपत्रात बंधपत्रासह, सॉफ्ट कॉपी व हार्ड कॉपी समाजकल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालयास सादर करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. तरीही अद्याप पर्यंत बºयाच महाविद्यालयाकडे आॅनलाईन अर्ज प्रलंबित असल्याचे दिसून येते. सर्व महाविद्यालयांनी परिपूर्ण व अचूक अर्ज १५ जुलैपर्यंत वाशिम येथील समाजकल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालयात सादर करण्याचे आवाहन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : सन २०१७-१८ मध्ये केंद्र व राज्य पुरस्कृत वि.जा.भ.ज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज आॅफलाईन पध्द्तीने व नूतनीकरणाचे विद्यार्थ्यांचे अर्ज सामाजिक न्याय विभागाच्या जुन्या प्रणालीवरुन सादर करावे लागणार आहेत. त्यानुसार सर्व महाविद्यालयांनी परिपूर्ण व अचूक अर्ज १५ जुलैपर्यंत वाशिम येथील समाजकल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालयात सादर करण्याचे आवाहन करण्यात आले.
समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालयाकडून जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांच्या वारंवार कार्यशाळा घेऊन २०१७-१८ मधील प्रस्ताव विहित प्रपत्रात बंधपत्रासह, सॉफ्ट कॉपी व हार्ड कॉपी समाजकल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालयास सादर करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. तरीही अद्याप पर्यंत बºयाच महाविद्यालयाकडे आॅनलाईन अर्ज प्रलंबित असल्याचे दिसून येते. तसेच सन २०१७-१८ मधील आॅफलाईन अर्ज बºयाच महाविद्यालयांनी सादर केलेले नाहीत. तसेच ज्या महाविद्यालयांनी अर्ज सादर केले तेही अपूर्ण व त्रृटीचे सादर केलेले आहेत.
पात्र मागसवर्गीय विद्यार्थ्यी लाभापासून वंचित राहू नये, याकरीता महाविद्यालयांनी आॅफलाईन व आॅनलाईन अर्ज दिनांक १५ जुलैपूर्वी समाजकल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालयाकडे सादर करावेत. अर्ज सादर न केल्यास व पात्र विद्यार्थी लाभापासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्यांवर निश्चित केली जाणार आहे, असा इशारा सहाय्यक आयुक्त माया केदार यांनी दिला.

Web Title: Post-Matric Scholarship scheme invites complete application!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.