मंगरूळपीरच्या नगराध्यक्षांचे पद धोक्यात; शासनातर्फे ‘शो- कॉज’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 01:57 AM2017-09-26T01:57:20+5:302017-09-26T01:57:20+5:30
मंगरूळपीर: मंगरूळपीर नगर परिषदेच्या नामनिर्देशित सदस्याची नियुक्ती करताना नियमाचा भंग केल्याप्रकरणी नगराध्यक्ष डॉ. गजाला खान यांना शासनाने १८ सप्टेंबरला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. त्यानुसार नगराध्यक्ष पदावरून पदच्युत करून ६ वर्षासाठी अनर्ह का करण्यात येऊ नये, अशी विचारणा केली आ
नंदलाल पवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरूळपीर: मंगरूळपीर नगर परिषदेच्या नामनिर्देशित सदस्याची नियुक्ती करताना नियमाचा भंग केल्याप्रकरणी नगराध्यक्ष डॉ. गजाला खान यांना शासनाने १८ सप्टेंबरला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. त्यानुसार नगराध्यक्ष पदावरून पदच्युत करून ६ वर्षासाठी अनर्ह का करण्यात येऊ नये, अशी विचारणा केली आहे. १५ दिवसात नोटीसला उत्तर देण्याची मुदत दिली आहे. नेहमीच या ना त्या कारणाहून चर्चेत राहणारी मंगरुळपीर नगर परिषद पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नोव्हेंबर २0१६ मध्ये नगर परिषदेची निवडणूक पार पडली. भाजप सात, राष्ट्रवादी काँग्रेस सात, राकाँ एक, भारिप एक, एमआयएम एक व अपक्ष एक असे एकूण १८ सदस्यीय संख्याबळ न. प मध्ये आहे. शासन नियमानुसार दोन नामनिर्देशित सदस्य नियुक्त करावयाचे होते. जिल्हाधिकार्यांचे ७ जानेवारी २0१७ च्या पत्रान्वये पक्षीय बलाबल पाहता नामनिर्देशित करून देण्याची संख्या निर्देशित करून दिली होती. पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा डॉ. गजाला खान यांनी भारिप बहुजन महासंघाला अनु™ोय नसताना अँड. मारूफ खान अफझल खान यांची निवड केली. ते त्यांचे पती आहेत. याप्रकरणी अशोक महादेव परळीकर यांनी शासनाकडे तक्रार केली होती. या तक्रारीवरून रीतसर चौकशी करून नगराध्यक्ष डॉ. गजाला खान यांना १८ स प्टेंबर रोजी शासनाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यामुळे राजकिय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.