डाकघर कर्मचाऱ्याने केला १६.६५ लाखाचा अपहार, नागरतास येथील घटना

By संतोष वानखडे | Published: August 24, 2023 03:00 PM2023-08-24T15:00:09+5:302023-08-24T15:00:24+5:30

आरोपीवर गुन्हा

Post office employee embezzled 16.65 lakhs, incident at Nagratas | डाकघर कर्मचाऱ्याने केला १६.६५ लाखाचा अपहार, नागरतास येथील घटना

डाकघर कर्मचाऱ्याने केला १६.६५ लाखाचा अपहार, नागरतास येथील घटना

googlenewsNext

वाशिम : मालेगाव डाकघर अंतर्गत नागरतास उपडाकघर येथे कार्यरत सत्येश्वर भारत अंभोरे (२६) याने १६ लाख ६५ हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी मालेगाव पोलिसांनी २३ आगस्टला त्याच्यावर गुन्हा दाखल केला.

अकोला पूर्व उपविभाग वाशिमचे डाकघर निरीक्षक निलेश विठोबा वायाळ (३७) यांनी मालेगाव पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार, सत्येश्वर भारत अंभोरे हे उपडाकपाल म्हणून नागरतास येथे १५ जून २०२० ते ७ नोव्हेंबर २०२२ पर्यंत कार्यरत होते. त्यांनी या कार्यकाळात सुमारे १६ लाख ६५ हजार ६५० रुपयांचा अपहार केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. सहाय्यक शाखा डाकपाल म्हणून काम करत असताना बचत खाते, सुकन्या, समृद्धी खाते, आवर्ती जमा खाते आणि सावदि जमा खातेमध्ये ग्राहकांकडून जमा करण्याकरिता रक्कम स्विकारल्या. त्या संबंधित ग्राहकाच्या पुस्तकात रक्कम स्वीकारल्याबाबत नोंद केली तसेच तारखेचा शिक्कादेखील व स्वाक्षरीसुद्धा केली. परंतु, या रकमा त्यांनी सरकारी हिशोबात न घेता स्वतःच्या खासगी फायद्याकरीता वापर केला. याप्रकरणी आरोपीवर भादंवी कलम ४०९ ,४२०, ४६५, ४६८ , ४७१ नुसार पुन्हा दाखल केला. पुढील तपास मालेगाव पोलिस करत आहेत.

खातेदाराच्या बनावट स्वाक्षऱ्या

आरोपीने काही वेळा खातेदाराच्या बनावट स्वाक्षऱ्या करून परस्पर त्यांच्या खात्यातील रक्कम काढली व त्या रकमेचा उपयोगस्वतःच्या खासगी कामाकरिता करून सरकारी पैशाचा अपहार केल्याचे चौकशी निष्पन्न झाले. आरोपी हा मुळचा बालाजी नगर, मेहकर येथील असून, त्याने नागरतास उपडाकघर येथे कार्यरत असताना पैशाचा अपहार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

Web Title: Post office employee embezzled 16.65 lakhs, incident at Nagratas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.