डाक घरातील आधार नोंदणी प्रक्रिया पडली बंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 04:46 PM2019-04-01T16:46:33+5:302019-04-01T16:46:47+5:30
गेल्या १५ दिवसांपासून आधार नोंदणी प्रक्रिया पूर्णत: बंद पडली असून यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूरजैन (वाशिम) : आधारकार्ड तयार करून देणे, त्यात विविध स्वरूपातील दुरूस्ती करण्याकरिता स्थानिक डाकघरात (पोस्टआॅफीस) व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, गेल्या १५ दिवसांपासून आधार नोंदणी प्रक्रिया पूर्णत: बंद पडली असून यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.
शासनाने आधार नोंदणी व दुरूस्तीसाठी बँक, पोस्टआॅफिस यासारख्या नागरिकांची सदोदित वर्दळ राहणाºया ठिकाणी आधार नोंदणी केंद्र कार्यान्वित केले. मात्र, आधार नोंदणी केंद्रावर अद्याप आधारकार्डांपासून वंचित असलेल्या लोकांना सुविधा कमी आणि असुविधाच अधिक असल्याचा अनुभव येत आहे. शिरपूरच्या पोस्टआॅफिसमधील आधार केंद्र गेल्या १५ दिवसांपासून बंद असल्याने आधार नोंदणी व दुरूस्तीची कामे खोळंबली आहेत.
मी १५ दिवसांपूर्वी पोस्टआॅफिसमध्ये नवीन आधार नोंदणीसाठी गेला होतो. तेव्हा तांत्रिक बिघाडाचे कारण समोर करून आपले काम झाले नाही. ही स्थिती अद्याप कायम असल्याने आधार नोंदणीपासून वंचित आहे.
जहागीर खान
रहिवासी, शिरपूर जैन
१६ मार्च पासून तांत्रिक बिघाडामुळे आधारसंबंधीची कागदपत्रे ‘डाऊनलोड’ होणे अशक्य झाले आहे. त्यामुळेच नवीन आधार नोंदणी तथा जुन्या कार्डांमधील दुरुस्तीची प्रक्रिया खोळंबली आहे.
दिनेश सरनाईक
पोस्टमास्टर, शिरपूर जैन