वाशिम शहरात पोस्टमनचा ‘दुष्काळ’
By admin | Published: June 5, 2014 12:46 AM2014-06-05T00:46:11+5:302014-06-05T00:58:20+5:30
टपाल विभागाला तब्बल ३0 वर्षापासून पोस्टमॅनची भरती करण्याला मुहूर्त गवसला नाही.
वाशिम : पोस्ट कार्यालयांचे आधुनिकीकरण करण्याचा डांगोरा पीटणार्या टपाल विभागाला तब्बल ३0 वर्षापासून पोस्टमॅनची भरती करण्याला मुहूर्त गवसला नाही. परिणामी टपाल विभागाचा कणा असलेल्या पोस्टमॅनची संख्या कमालीची रोडावली. वाशिम शहरही याला अपवाद नाही. शहरात आजमितीला केवळ सहाच पोस्टमॅन कार्यरत असल्याची धक्कादायक माहीती हाती आली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून दळणवळणाच्या क्षेत्रात पोस्टाची मक्तेदारी राहिली आहे. काही वर्षापर्यंत पोस्टाच्या सेवेशिवाय सं पर्काचे साधन नव्हते. त्यामुळे कोणताही महत्त्वाचा निरोप, खुशाली, नोकरीविषयक पत्रे तसेच अन्य महत्वपूर्ण कागद पत्रासाठी पोस्टमनचीच वाट पाहावी लागत होती. परंतु गेल्या सा त-आठ वर्षात परिस्थिती बदलली आहे. स्पर्धात्मक युगामध्ये खुली अर्थव्यवस्था, जागतिकीकरण व बाजारीकरणामुळे पोस्टाशिवाय अन्य माध्यमातूनही जनतेला विविध प्रकारच्या सेवासुविधा मिळू लागल्या आहेत. याचा विपरित परिणाम पोस्टावर होऊ लागला आहे. पोस्टाची होणारी अधोगती थांबविण्यासाठी टपाल विभागाने प्रोजेक्ट अँरो सारख्या विविध महत्वपूर्ण योजना राबविल्या आहेत. त्यातून पोस्ट कार्यालयांचे आधुनिकरण करण्यात आले आहे. परंतु आधुनिकरण करीत असताना टपाल विभागाचा कणा असलेल्या पोस्टमॅनची कडे या विभागाचे सपसेल दुर्लक्षच झाले आहे. दरम्यान शहरात आणखी तिन पोस्टमॅनचे पद वाढवून द्यावा असा प्रस्ताव स्थानिक डाक प्रशासनाने वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविला आहे. तथापि, भरतीच बंद असल्याचे कारण समोर करून वरिष्ठानी सदर प्रस्ताव लालफितीत गुंडाळून ठेवला असल्याचेच दिसून येत आहे.