मालेगाव रस्त्यावरील खड्डे बुजविलेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:37 AM2021-02-07T04:37:14+5:302021-02-07T04:37:14+5:30

................... गहू पिकावर मर राेगाचा प्रादुर्भाव ताेंडगाव : वातावरणातील बदलामुळे परिसरात गेल्या ८ दिवसांपासून धुके पडत असल्याने आधीच ...

The potholes on Malegaon road were filled | मालेगाव रस्त्यावरील खड्डे बुजविलेत

मालेगाव रस्त्यावरील खड्डे बुजविलेत

Next

...................

गहू पिकावर मर राेगाचा प्रादुर्भाव

ताेंडगाव : वातावरणातील बदलामुळे परिसरात गेल्या ८ दिवसांपासून धुके पडत असल्याने आधीच हरभरा पिकावर मुरकूज रोगाचा प्रादुर्भाव झाला असताना आता गहू पिकावरही मर रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याने हे पीक सुकत आहे. त्यामुळे शेतकरी एका नव्या नैसर्गिक संकटात सापडले आहेत.

...................

देपूळ येथे सांडपाण्याची व्यवस्था

अनसिंग : देपूळ ग्रामपंचायतीने ऑपरेशन सांडपाणी ही मोहीम हाती घेतली असून, ग्रामपंचायतीने गावातील मुख्य रस्त्यावर दोन्ही कडेला नाल्याची निर्मिती करून गावातील सांडपाण्याला व्यवस्थित बाहेर काढले आहे. त्यामुळे रस्त्यावर साचणारे पाणी बंद झाले आहे.

...................

२८ हजार ३७० ग्रामस्थांची तपासणी

मंगरूळपीर : क्षयरोग शोधमोहिमेंतर्गत तालुक्यातील आसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या पाच आरोग्य उपकेंद्रांतील २१ गावांत २८ हजार ३७० ग्रामस्थांची तपासणी आरोग्य पथकाच्या वतीने करण्यात आली आहे.

................

वन्यप्राण्यांकडून करडी पिकांचे नुकसान

रिठद : परिसरातील शेतकऱ्यांनी करडईचे उत्पन्न घेण्याचा प्रयाेग केला असताना शेतातील करडई पिकाचे वन्य प्राणी मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत. नुकसानीची पाहणी करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे.

...................

धोडप प्रकल्पाची पातळी खालावली

केनवड : रिसाेड तालुक्यात गत पावसाळ्यात दमदार पाऊस पडल्याने बहुतांश प्रकल्पांच्या पातळीत वाढ झाली. तथापि, भर जहांगीर येथून जवळच असलेल्या धोडप येथील प्रकल्पात पुरेसा साठा हाेता. त्यात आता सिंचनासाठी उपसा होत असल्याने या प्रकल्पाची पातळी माेठ्या प्रमाणात खालावली आहे.

Web Title: The potholes on Malegaon road were filled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.