रस्त्यावर खड्डा ; वाहनचालकांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:27 AM2021-07-01T04:27:45+5:302021-07-01T04:27:45+5:30
००० अनुदान प्रलंबित ; शेतकरी त्रस्त वाशिम : रोजगार हमी योजनेंतर्गत रिसोड, मालेगाव तालुक्यात शेतकऱ्यांच्या वैयक्तिक लाभाची कामे पूर्ण ...
०००
अनुदान प्रलंबित ; शेतकरी त्रस्त
वाशिम : रोजगार हमी योजनेंतर्गत रिसोड, मालेगाव तालुक्यात शेतकऱ्यांच्या वैयक्तिक लाभाची कामे पूर्ण झाल्यानंतरही अनुदान मिळाले नाही. यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. याकडे लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांनी बुधवारी केली.
००
आत्मा अभियानाची कामे सुरू करावी !
वाशिम : जिल्ह्यात मार्च ते मे या दरम्यान कोरोना विषाणू संसर्ग वाढल्याने कृषी विभागाच्या व आत्मा विभागांतर्गतच्या विविध योजना राबविण्यात अडचणी आल्या. आता दुसरी लाट ओसरल्यानंतर आत्मा अभियानांतर्गतची कामे सुरू करण्याची मागणी होत आहे.
००००
जमिनीचा मोबदला देण्याची मागणी
वाशिम : लघु पाटबंधारे विभागांतर्गत उभारणी करण्यात येत असलेल्या उमरी प्रकल्पाकरिता संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला संपूर्ण शेतकऱ्यांना अद्याप मिळाला नाही. मोबदला देण्याची मागणी शेतकऱ्यांनी बुधवारी केली आहे.
००
केनवड परिसरातील रस्त्यांची दुरवस्था
वाशिम : केनवड परिसरातील ग्रामीण रस्त्यांची दैनावस्था झाली आहे. इतर गावांना जोडणारे रस्ते दयनीय अवस्थेत आहेत. खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप आहे.