विविध मागण्यांसाठी कुंभार समाज आक्रमक; राज्यव्यापी धरणे आंदोलनाचे आयोजन! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 07:57 PM2017-12-10T19:57:03+5:302017-12-10T19:57:28+5:30

वाशिम: विविध प्रलंबित मागण्यांबाबत कुं भार समाज बांधवांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र कुंभार समाज महासंघाच्यावतीने १५ डिसेंबर रोजी राज्यव्यापी आंदोलनाचे आयोजन केले असून, हे आंदोलन राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर करण्यात येणार आहे.

Potter community aggressive for various demands; Statewide Demolition Movement organized! | विविध मागण्यांसाठी कुंभार समाज आक्रमक; राज्यव्यापी धरणे आंदोलनाचे आयोजन! 

विविध मागण्यांसाठी कुंभार समाज आक्रमक; राज्यव्यापी धरणे आंदोलनाचे आयोजन! 

Next
ठळक मुद्देमहाराष्ट्र कुंभार समाज महासंघाचे आयोजन  

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: विविध प्रलंबित मागण्यांबाबत कुं भार समाज बांधवांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र कुंभार समाज महासंघाच्यावतीने १५ डिसेंबर रोजी राज्यव्यापी आंदोलनाचे आयोजन केले असून, हे आंदोलन राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर करण्यात येणार आहे. वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर होणा-या धरणे आंदोलनात जिल्हयातील कुंभार समाज बांधवांनी हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन महाराष्ट्र कुंभार समाज महासंघाचे प्रदेश सरचिटणीस सुभाष तेटवार यांनी केले आहे.
मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान व गोवा आदी राज्याप्रमाणे स्वतंत्र माती कला बोर्ड स्थापन करावे, कुंभार समाजाचा भटक्या विमुक्त जमातीमध्ये समावेश करावा, सरकारी नोंद असलेल्या कुंभारखाणी समाजाला बहाल कराव्या, समाजाला विधान परिषदेत प्रतिनिधीत्व द्यावे, विट, मडकी व मूर्ती व्यवस्थापनासाठी शासकीय जागा उपलब्ध करुन द्याव्यात, संत शिरोमणी गोरोबाकाका यांचे जन्मगाव तेर येथील विकास आराखडा तयार करुन तिर्थक्षेत्राचा अ दर्जा द्यावा, मातीवरील रॉयल्टी माफ करुन समाजातील विट व्यावसायिकांना परवाना द्यावा, पन्नास वर्षावरील निवृत्त कारागिरांना मासिक तीन हजार रुपये मानधन द्यावे, एमआयडीसीतील जागा कुंभार समाजाला अग्रक्रमाने द्यावी, प्लॉस्टर आॅफ पॅरीसच्या मुर्तीवर पूर्णपणे बंदी घालावी, आदि मागण्यांच्या पूर्ततेसाठी हे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. कुंभार समाजाच्या या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात १५ डिसेंबर रोजी राज्यव्यापी धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे धरणे आंदोलन यशस्वी करण्यासाठी कुंभार समाज बांधवांनी हजारोंच्या संख्येने सहभाग नोंंदविण्याचे आवान महाराष्ट्र कुंभार समाज महासंघाने केले आहे.
 

Web Title: Potter community aggressive for various demands; Statewide Demolition Movement organized!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.