'बर्ड फ्लू’च्या भितीने कुक्कुटपालन व्यवसासायिक अडचणीत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 01:01 PM2021-01-09T13:01:02+5:302021-01-09T13:02:17+5:30

Bird Flu : जिल्ह्यात ‘बर्ड फ्लू’चा धोका नसला तरी अनेकजण खबरदारी घेत असल्याने कुक्कुटपालन व्यावसायिक अडचणीत सापडत आहेत.

Poultry business in trouble due to fear of bird flu! | 'बर्ड फ्लू’च्या भितीने कुक्कुटपालन व्यवसासायिक अडचणीत !

'बर्ड फ्लू’च्या भितीने कुक्कुटपालन व्यवसासायिक अडचणीत !

Next

भर जहॉंगीर : अन्य राज्यात ‘बर्ड फ्लू’चे संकट आल्याने जिल्ह्यातही सतर्कता बाळगली जात आहे. सध्या जिल्ह्यात ‘बर्ड फ्लू’चा धोका नसला तरी अनेकजण खबरदारी घेत असल्याने कुक्कुटपालन व्यावसायिक अडचणीत सापडत आहेत.
शेतीला जोडधंदा म्हणून भर जहॉंगीर परिसरामध्ये अनेक सुशिक्षित बेरोजगार युवकांनी गत पाच-सहा वर्षांपासून कुक्कुट पालन व्यवसाय थाटला. वेगवेगळ्या खासगी कंपन्यांसोबत करार करून सुमारे दहा हजार पक्ष्यांचे संगोपन केल्या जाईल ऐवड्या आकाराचे शेड निर्माण केले. आधी कोरोनामुळे व्यावसायिक अडचणीत आले होते. अनलॉकच्या टप्प्यात कुक्कुटपालन व्यवसाय पूर्वपदावर आला. गत दोन महिन्यापासून कुक्कुटपालन व्यवसाय बºयापैकी सुरू असताना, अलिकडच्या काळात राजस्थान, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेशात बर्ड फ्लूमुळे पक्ष्यांचा मृत्यू होत आहे. विदर्भात सध्या बर्ड फ्लूचे संकट आले नाही. आगामी काळात ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव जिल्ह्यात होऊ नये म्हणून पशूसंवर्धन विभाग अलर्ट झाला आहे. दरम्यान, बर्ड फ्लूच्या भितीने भर जहॉगीर परिसरातील कुक्कुटपालक धास्तावल्याचे दिसून येते. एका-एका ‘पोल्ट्री फॉर्म’मध्ये सुमारे दहा हजारापर्यंत पक्षी मर्यादा आहे. एका पिल्लाचा सांभाळ करताना सरासरी १६० ते १८० रुपये खर्च येतो. ‘बर्ड फ्लू’च्या भीतीने पोल्ट्री फॉर्म ओस पडत असल्याचे चित्र भर जहॉंगीर परिसरात पाहावयास मिळत आहे.
 
 
शेतीला जोडधंदा म्हणून कुक्कुट पालन करावे, असा सल्ला शेतकºयांना दिला जातो. कुक्कुटपालन व्यवसाय हा शेतीशी निगडीत असल्याने शासनाकडून विमा कवच मिळणे अपेक्षीत आहे. विम्यामुळे संकटकाळी भरपाई मिळू शकेल.
- डॉ.ज्ञानेश्वर फड, कुक्कुट पालन व्यावसायिक
 
मागील तीन वर्षांपासून पोल्ट्रीफॉर्मचा व्यवसाय करीत आहे. व्यवसाय चांगला आहे. परंतु ‘बर्ड फ्लू’च्या अफवेने या व्यवसायापुढे सध्या आर्थिक संकट उभे ठाकले आहे. नुकसानभरपाई मिळाल्यास दिलासा मिळेल.
- गणेश झाडे, कुक्कुट पालन व्यावसायिक

Web Title: Poultry business in trouble due to fear of bird flu!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.