वीज बिल वसुलीची धडक मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 05:18 AM2021-02-21T05:18:14+5:302021-02-21T05:18:14+5:30

मालेगाव : - कोरोनाच्या महामारीमुळे पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये गत दहा महिन्यापासून शहरातील वीज ग्राहकांकडे तब्बल एक कोटी ६० ...

Power bill recovery drive | वीज बिल वसुलीची धडक मोहीम

वीज बिल वसुलीची धडक मोहीम

Next

मालेगाव : - कोरोनाच्या महामारीमुळे पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये गत दहा महिन्यापासून शहरातील वीज ग्राहकांकडे तब्बल एक कोटी ६० लक्ष रुपयाची थकबाकी झालेली असल्यामुळे, वीज वितरण कंपनीने वीजपुरवठा खंडित करण्याची धडक मोहीम हाती घेतली आहे .

कंपनीने थकीत ग्राहकांचा पुरवठा खंडित करणे सुरू केले आहे. कोरोना या महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाने लॉकडाऊन पुकारले होते. त्यामुळे गत वर्षभरापासून वीज वितरण कंपनीकडून वीज बिल सक्तीने वसुली न करता ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा केला होता . हळूहळू लॉकडाऊन उघडल्यानंतर व्यापारपेठ सुरळीत सुरू झाल्यानंतर वीज वितरण कंपनीने वीज बिलाचा भरणा करण्याचे अनेकवेळा आवाहन केले होते. परंतु ग्राहकांकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्यामुळे वीज वितरण कंपनीच्या आदेशावरून मालेगाव शहरात वीजपुरवठा खंडित करण्याची धडक मोहीम हाती घेतली असल्याचे दिसून येते. वीज ग्राहकांकडे तब्बल एक कोटी ६० लक्ष रुपयाची थकबाकी झाली असून, ५६ ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. वीज ग्राहकांनी थकीत रकमेचा त्वरित भरणा करून वीज वितरण कंपनीला सहकार्य करण्याचे आवाहन वीज वितरण कंपनी मालेगावचे शाखा अभियंता क्षीरसागर यांनी केले आहे.

Web Title: Power bill recovery drive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.