विज कंत्राटी कामगारांचे आज अन्नत्याग आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:29 AM2021-06-03T04:29:25+5:302021-06-03T04:29:25+5:30
या आंदाेलनात सर्व कंत्राटी कामगार काळ्या फीतीला निषेध व्यक्त करणार असुन या आंदोलनामध्ये राज्यातील तिन्ही विज कंपनीतील ...
या आंदाेलनात सर्व कंत्राटी कामगार काळ्या फीतीला निषेध व्यक्त करणार असुन या आंदोलनामध्ये राज्यातील तिन्ही विज कंपनीतील कंत्राटी कामगारांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन तांत्रिक अप्रेटिस कंत्राटी कामगार असोसिएशनचे राज्य अध्यक्ष प्रभाकर लहाने यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात केले आहे.
कंपनीमध्ये कार्यरत कंत्राटी कामगार कोविड १९ कालावधी मधील सेवकाला पाहता त्यांना कायम सेवेत सामावून घ्यावे, त्याकरिता विशेष भरती मोहीम राबविण्यात यावी,कंत्राटी कामगारांना सरळ सेवेत भरती मध्ये आरक्षण देवून प्राध्यानेने सामावून घेण्यात यावे,कंत्राटी कामगारांना रोजदारी पद्धतीने कामावर घेऊन शाश्वत रोजंदारीची हमी द्यावी.शासनाच्या नियमाप्रमाणे महावितरण कंपनीमधील सरळ सेवे भरती करीता वयोमर्यादित मध्ये वाढ करण्यात यावी आदी मागण्यांचा समावेश आहे. आंदाेलनात सहभागी हाेण्याचे आवाहन प्रभाकर लहाने,राज्य उपाध्यक्ष नितीन चव्हाण, प्रदीप पाटील,प्रशांत नन्नरे, सरचिटणीस शेख राहील आदिंनी केले.