वीज वितरण कंपनीच्या अधिकाºयांना धरले धारेवर

By Admin | Published: June 16, 2017 01:47 PM2017-06-16T13:47:53+5:302017-06-16T13:47:53+5:30

भाजप पदाधिकाºयांनी महाराष्ट्र वीज वितरण कंपनीच्या अधिकाºयांना चांगलेच धारेवर धरले.

Power distribution company officials arrested Dharevar | वीज वितरण कंपनीच्या अधिकाºयांना धरले धारेवर

वीज वितरण कंपनीच्या अधिकाºयांना धरले धारेवर

googlenewsNext

नागरिकांचा संताप: भाजप पदाधिकारी संतप्त
खामगाव: मान्सूनपूर्व रखडलेली कामे आणि शहरातील विद्युत समस्येबाबत शुक्रवारी भाजप पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी नागरिकांचे फोन न उचलणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना वरिष्ठांनी कानपिचक्याही दिल्या.
खामगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून विद्युत कंपनीकडून नागरिकांना वेठीस धरले जात आहे. वारंवार तक्रार देवूनही उपयोग होत नाही, तसेच तक्रार केंद्रावरील संबधीत कर्मचारी फोन उचलत नाही, यासह सर्वसामान्य नागरिकांच्या विविध समस्यांबाबत गुरूवारी भाजप पदाधिकाऱ्यांनी नागरिकांसह वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक दिली. यावेळी भाजपचे शहर अध्यक्ष संजय शिनगारे, पाणी पुरवठा सभापती सतीश दूडे, आरोग्य सभापती राजेंद्र धनोकार, बांधकाम सभापती विलास देशमुख, देवेश भगत, भाजयुमोचे अध्यक्ष राम मिश्रा यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती.

Web Title: Power distribution company officials arrested Dharevar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.