२४ दिवसात ४०० जणांचा वीजपुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:29 AM2021-06-25T04:29:11+5:302021-06-25T04:29:11+5:30
वाशिम जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटामुळे मध्यंतरी वीज देयक वसुलीला ‘ब्रेक’ लागला होता. त्यामुळे घरगुती, वाणिज्य, औद्योगिक, पाणीपुरवठा, पथदिवे ...
वाशिम जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटामुळे मध्यंतरी वीज देयक वसुलीला ‘ब्रेक’ लागला होता. त्यामुळे घरगुती, वाणिज्य, औद्योगिक, पाणीपुरवठा, पथदिवे यासह इतर वर्गवारीतील वीज वापर करणाऱ्या ग्राहकांकडे ३१ मे अखेर ७५.७९ कोटी रुपये थकीत होते. १ जूनपासून संसर्गाचे संकट ओसरू लागताच महावितरणने ही वीज देयक वसुलीची धडक मोहीम हाती घेतली आहे. यामाध्यमातून गेल्या २४ दिवसात २ कोटी रुपयांची वसुली करण्यात आली असून देयक अदा करण्यास टाळाटाळ करत असलेल्या १६५ ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात ; तर २३९ ग्राहकांना वीजपुरवठा कायमस्वरूपी तोडण्यात आला आहे.
....................
कोट :
जिल्ह्यात घरगुती, वाणिज्य, औद्योगिक, पाणीपुरवठा, पथदिवे यासह इतर वर्गवारीतील वीज वापर करणाऱ्या ग्राहकांकडे ७५ कोटींपेक्षा अधिक रक्कम थकीत आहे. देयक अदा केले जात नसल्याने नाईलाजास्तव धडक कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
- रत्नदीप तायडे
कार्यकारी अभियंता, महावितरण, वाशिम