विजेचा लपंडाव, नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:29 AM2021-06-03T04:29:18+5:302021-06-03T04:29:18+5:30

मान्सूनपूर्व कामास प्रारंभ वाशिम : स्थानिक नगर परिषदेने मान्सूनपूर्व कामे हाती घेतली आहेत. याअंतर्गत शहरातील सांडपाणी वाहून नेणाऱ्या ...

Power outage, citizens suffering | विजेचा लपंडाव, नागरिक त्रस्त

विजेचा लपंडाव, नागरिक त्रस्त

Next

मान्सूनपूर्व कामास प्रारंभ

वाशिम : स्थानिक नगर परिषदेने मान्सूनपूर्व कामे हाती घेतली आहेत. याअंतर्गत शहरातील सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांची स्वच्छता केली जात आहे.

सुविधाअभावी रुग्णांची गैरसाेय

वाशिम : जिल्ह्यात आरोग्यविषयक विविध प्रश्न प्रलंबित आहेत. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक सुविधा नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. अनेक रुग्णांना अकोला ‘रेफर’ केले जात आहे.

रस्त्याची दुरूस्ती करण्याची मागणी

वाशिम : पाटणी चाैकातून सिंधी कॅम्पमार्गे पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. संबंधित यंत्रणेने दखल घेऊन रस्ता दुरूस्तीकडे लक्ष पुरवावे, अशी मागणी होत आहे.

ग्रामीण भागात रस्त्यांची दुरवस्था

मानोरा : तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची सध्या दुरवस्था झाली आहे. यामुळे वाहनचालकांची गैरसोय होत असून, रस्ते दुरूस्त करण्याची मागणी होत आहे. तथापी, पावसाळ्यापूर्वी रस्त्याची दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Power outage, citizens suffering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.