मेडशीतील विजेचा लपंडाव बेतताेय ग्रामस्थांच्या जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:47 AM2021-08-20T04:47:47+5:302021-08-20T04:47:47+5:30

पावसाळ्याचे दिवस असल्याने रात्री अपरात्री सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर वाढला आहे. रात्रीच्या सुमारास येथील प्रसिद्ध महाराज पंजाबबाबा यांना राहत्या घरात ...

The power outage in Medashi has affected the lives of the villagers | मेडशीतील विजेचा लपंडाव बेतताेय ग्रामस्थांच्या जीवावर

मेडशीतील विजेचा लपंडाव बेतताेय ग्रामस्थांच्या जीवावर

googlenewsNext

पावसाळ्याचे दिवस असल्याने रात्री अपरात्री सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर वाढला आहे. रात्रीच्या सुमारास येथील प्रसिद्ध महाराज पंजाबबाबा यांना राहत्या घरात सर्पदंश झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली तर इतर ५ स्त्रियांना सर्पदंश झाल्याने पुढील उपचारार्थ त्यांना अकोला येथे हलविण्यात आले. येथील कार्यरत तंत्रज्ञ गत १७ महिन्यापासून मालेगाव उपविभागीय कार्यालयात काम करीत असून पगार मात्र मेडशी येथून काढत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत ग्रामस्थांना माहिती मिळताच माजी उपसरपंच शेख रज्जाकभाई, तंटामुक्ती अध्यक्ष ज्ञानदेव साठे, माजी अध्यक्ष शौकत पठाण, माजी तंटामुक्ती अध्यक्ष विनोद तायडे, सुभाष तायडे आदींनी उपविभागीय कार्यालयात धडक देऊन उपअभियंता जीवनानी यांना जाब विचारला. मेडशी येथे नियुक्तीवर असलेला तंत्रज्ञ गोरे यांना मालेगाव शहराच्या ठिकाणी काम करीत असल्याने त्यांना मेडशीला परत पाठविण्यात यावे. पावर हाऊसला रिले बसवावा, एबी स्विच त्वरित बसवावा, विजेचा लपंडाव बंद करण्याची मागणी एका शिष्टमंडळाने उपअभियंता जीवनानी यांच्याकडे केली. तसेच आंदोलनाचा इशारा दिला. आंदाेलनाचा इशारा देताच उपअभियंत्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून मेडशी येथे वानखडे नामक वरिष्ठ तंत्रज्ञ यांची नियुक्ती केली जाणार असून गोरे नामक तंत्रज्ञाला मेडशी परत पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले.

Web Title: The power outage in Medashi has affected the lives of the villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.