वाशिम जिल्ह्यात थकबाकीदार ४३०० ग्राहकांच्या विद्यूत जोडण्या खंडित!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 03:27 PM2019-03-08T15:27:18+5:302019-03-08T15:30:32+5:30
महावितरणने आता धडक कारवाईचे सत्र अवलंबिले असून जिल्ह्यातील ४३०० ग्राहकांच्या विद्यूत जोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यातील घरगुती स्वरूपात विजेचा वापर करणाºया ग्राहकांकडे विद्यूत देयकांची असलेली थकबाकी ३० कोटी रुपयांपेक्षा अधिक झाली आहे. ही रक्कम वसूल करताना महावितरणच्या कर्मचाºयांची अक्षरश: दमछाक होत आहे. दरम्यान, महावितरणने आता धडक कारवाईचे सत्र अवलंबिले असून जिल्ह्यातील ४३०० ग्राहकांच्या विद्यूत जोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत, अशी माहिती महावितरणचे अधीक्षक अभियंता व्ही.बी. बेथारिया यांनी गुरूवारी दिली.
३१ मार्च २०१९ पूर्वी थकबाकीदार घरगुती ग्राहकांकडील सर्व थकबाकी वसूल करण्याचे सक्तीचे निर्देश वरिष्ठ पातळीवरून देण्यात आले आहेत. वसूलीच्या कामात दिरंगाई करणाºया कर्मचाºयांवरही कारवाई करण्याच्या सूचना असल्याने गेल्या काही दिवसांपासून महावितरणची अधिकांश यंत्रणा वसूलीच्या कामात गुंतली आहे. असे असले तरी अनेकवेळा संधी देवूनही विद्यूत देयकांची थकबाकी अदा न करणाºया ग्राहकांकडून आताही विशेष प्रतिसाद मिळत नसल्याचे निदर्शना स येत आहे. त्यामुळेच धडक कारवाईची मोहिम हाती घेवून २१४० ग्राहकांचा विद्यूत पुरवठा तात्पुरता; तर २१६८ ग्राहकांचा विद्यूत पुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला आहे. कारवाईचे हे सत्र यापुढेही सुरूच राहणार असल्याने थकबाकीदार ग्राहकांनी त्यांच्याकडे असलेली विद्यूत देयकांची थकबाकी विनाविलंब अदा करून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन अधीक्षक अभियंता बेथारिया यांनी केले आहे.