धगधगत्या निखाऱ्यांवर चालून नवस फेडण्याची प्रथा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 12:24 PM2018-12-23T12:24:04+5:302018-12-23T12:33:26+5:30
वाशिम : आपण अनेक यात्रा पाहिल्या असतील प्रत्येक यात्रे मध्ये विविध प्रकारे देवाचा नवस पूर्ण करण्याची प्रथा असते , मात्र आगीच्या जळत्या नीखाऱ्यावर चालून नवस फेडण्याची प्रथा वाशिम तालुक्यातील ब्रम्हा गावात आहे .
- नंदकिशोर नारे
वाशिम : आपण अनेक यात्रा पाहिल्या असतील प्रत्येक यात्रे मध्ये विविध प्रकारे देवाचा नवस पूर्ण करण्याची प्रथा असते , मात्र धगधगत्या निखाºयांवर चालून नवस फेडण्याची प्रथा वाशिम तालुक्यातील ब्रम्हा गावात आहे . दत्तजयंती २२ डिसेंबरला संध्याकाळी सुरू झालेल्या या नवस फेडण्याची प्रथा रात्री उशिरापर्यंत सुरु होती .
वाशिम तालुक्यातील ब्रम्हा गावातील दत्तजयंती निमित्त २०० वर्षा पूर्वीपासूनची जगदंबा देवीची यात्रा भरते . या यात्रेमध्ये पुरुष डोक्याच्या केसांच्या शेंडीपासून बैल गाडी ओढून नवस फेडण्याची परंपरा आहे तर महिलाचा नवस पूर्ण करण्याची परंपरा म्हणजे अंगावर काटा आणणारी म्हणजे जळत्या आगीच्या नीखाऱ्यावर चालून नवस फेडण्याची आहे . या नवस फेडण्याचाच्या परंपराला 'लहाड ' अस म्हणतात . या लहाड मध्ये ५ महिलांना प्रवेश दिला जातो . ह्या महिला आगीच्या नीखाऱ्याला प्रदक्षिणा घालत एक महिला किमान ३ वेळा चालत जाऊन आपला नवस पूर्ण करते .
भाविकांच्या मते ही कुठली अंधश्रद्धा नसून ज्याची त्याची श्रद्धा आहे . इथं कुणालाच जबरदस्ती केली जात नसून जगदंबा देवी चा नवस फेडण्याचा प्रकार आहे .