प्रधानमंत्री जन आरोग्य योजना : १.७२ कोटी लाभार्थींना ‘गोल्डन कार्ड’ ची प्रतिक्षा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 02:26 PM2020-02-11T14:26:21+5:302020-02-11T14:26:38+5:30
राज्यातील दोन कोटी ३५ लाख २६ हजार २५७ पैकी ६३.१४ लाख लाभार्थींना गोल्डन कार्ड वाटप केले असून, उर्वरीत १.७२ कोटी लाभार्थींना सदर कार्डची प्रतिक्षा आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत राज्यातील दोन कोटी ३५ लाख २६ हजार २५७ पैकी ६३.१४ लाख लाभार्थींना गोल्डन कार्ड वाटप केले असून, उर्वरीत १.७२ कोटी लाभार्थींना सदर कार्डची प्रतिक्षा आहे. कार्डची प्रतिक्षा असलेल्या या लाभार्थींमध्ये पश्चिम वºहाडातील ११.८७ लाख लाभार्थींचा समावेश आहे.
पात्र लाभार्थींना आरोग्यविषयक सुविधांचा लाभ देण्यासाठी आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंमलात आली आहे. राज्य शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या रुग्णालयांमध्ये आयुष्मान भारत योजनेच्या गोल्डन कार्डधारकांना सुद्धा आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिली आहे. राज्यातील दोन कोटी ३५ लाख २६ हजार २५७ पैकी ६३ लाख १४ हजार ४८४ लाभार्थींना गोल्डन कार्डचे वाटप करण्यात आले आहे. पश्चिम वºहाडातील १८ लाख ३७ हजार ७९ पैकी ६ लाख ५० हजार २० लाभार्थींना गोल्डन कार्ड मिळाले असून, उर्वरीत ११ लाख ८७ हजार ५९ लाभार्थींना गोल्डन कार्डची प्रतिक्षा आहे. वाशिम जिल्ह्यातील ४ लाख १५ हजार १७५ पैकी १ लाख २३ हजार २५३ लाभार्थींना गोल्डन कार्ड वाटप करण्यात आले. अकोला जिल्ह्यातील ७ लाख १९ हजार ६८१ लाभार्थीपैकी २ लाख ५६ हजार ६०२ लाभार्थींना वाटप करण्यात आले. बुलडाणा जिल्ह्यातील ७ लाख २ हजार २२३ पैकी २ लाख ७० हजार १६५ लाभार्थींना गोल्डन कार्ड वाटप करण्यात आले. सदर कार्ड प्राप्त करून घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना आपले सरकार सेवा केंद्र, कॉमन सर्व्हिस सेंटर यासह महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये अंगीकृत असलेल्या सरकारी दवाखाने तसेच खासगी दवाखान्यातील आरोग्य मित्रांकडे नोंदणी करावी लागते.
शासन निर्देशानुसार वाशिम जिल्हयात पात्र लाभार्थींना गोल्डन कार्ड वाटप करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
- डॉ.अविनाश आहेर,
जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम.