जानेवारीत ‘पीआरसी’चा वाशिम दौरा; जिल्हा परिषद प्रशासन लागले कामाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 04:18 PM2017-12-19T16:18:30+5:302017-12-19T16:21:14+5:30
वाशिम : येत्या १७ ते १९ जानेवारी दरम्यान वाशिम जिल्ह्यात धडकणाऱ्या विधिमंडळाच्या पंचायत राज समितीच्या (पीआरसी) दौऱ्या पूर्वी प्रशासनातर्फे बैठकांवर बैठका घेतल्या जात असून, रेकॉर्ड अद्ययावत ठेवण्यासाठी धावपळ सुरू असल्याचे दिसून येते.
वाशिम : येत्या १७ ते १९ जानेवारी दरम्यान वाशिम जिल्ह्यात धडकणाऱ्या विधिमंडळाच्या पंचायत राज समितीच्या (पीआरसी) दौऱ्या पूर्वी प्रशासनातर्फे बैठकांवर बैठका घेतल्या जात असून, रेकॉर्ड अद्ययावत ठेवण्यासाठी धावपळ सुरू असल्याचे दिसून येते.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या (ग्रामीण) कामकाजात पारदर्शकता राहावी, शासकीय निधीचा विनियोग योग्य पद्धतीने प्रस्तावित कामांवरच व्हावा, शासकीय नियमात हेराफेरी करणाºयांवर वचक निर्माण व्हावा, गैरप्रकार करणाºयांविरूद्ध कठोर कारवाई व्हावी आदी उद्देश डोळ्यासमोर ठेवून विधिमंडळाच्या पंचायत राज समितीतर्फे स्थानिक स्वराज्य संस्थेला (ग्रामीण) भेट देऊन पाहणी केली जाते. या दौºयादरम्यान जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतसह जिल्हा परिषद अंतर्गत येणाºया सर्वच विभागाची पोलखोल करण्याचे काम पंचायत राज समितीतर्फे केले जाते. पंचायत राज समितीच्या आगामी दौऱ्याच्या पृष्ठभूमीवर जिल्हा परिषद प्रशासनातर्फे विभागनिहाय सभा, बैठका घेऊन संपूर्ण रेकॉर्ड अद्ययावत ठेवण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे. शासकीय योजनेंतर्गतचा मंजूर निधी, झालेला खर्च आणि प्रत्यक्षातील काम तसेच अन्य दंड, वसूली असल्यास चालानच्या पावती व अन्य प्रशासकीय सोपस्कार परिपूर्ण ठेवण्याच्या दृष्टिने बैठका घेतल्या जात असल्याचे दिसून येते. सध्या जिल्हा परिषद, पंचायत समितीस्तरावर केवळ ‘पीआरसी’च्या आगामी दौºयाचीच चर्चा ऐकायला मिळत आहे. प्रत्येक विभागात अधिकारी व कर्मचारी हे संपूर्ण रेकॉर्ड अद्ययावत करण्यात व्यस्त असल्याचे दिसून येते. जमा-खर्चाचा ताळमेळ बसविण्यात काही विभागांची चांगलीच दमछाक होत असल्याची चर्चा आहे. स्थानिक निधी लेखा परीक्षक विभागाने नोंदविलेल्या आक्षेपांचे निराकरण, दंड वसूलीसंदर्भातील चालान या दृष्टिकोनातून अधिकारी-कर्मचारी रेकॉर्ड अद्ययावत ठेवत असल्याचे दिसून येते.