निधीची तरतूद नसताना मान्सूनपूर्व कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:51 AM2021-06-09T04:51:17+5:302021-06-09T04:51:17+5:30
कारंजात पावसाळा सुरू होण्याआधी सर्व नाल्यांची सफाई करून पावसाचे पाणी सुरळीत वाहण्यास मोकळे करण्यात आले आहेत. मात्र, याकरिता निधी ...
कारंजात पावसाळा सुरू होण्याआधी सर्व नाल्यांची सफाई करून पावसाचे पाणी सुरळीत वाहण्यास मोकळे करण्यात आले आहेत. मात्र, याकरिता निधी नसल्याची माहिती मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांनी दिली.
मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांच्या निर्देशाप्रमाणे शहरातील मोठे, लहान नाले व भूमिगत नाल्यांचे चेंबर युद्धस्तरावर सफाई काम करण्यात येत आहे, तसेच तुटफूट झालेल्या ठिकाणी नाले त्वरित दुरुस्ती करणे, ज्या ठिकाणी नाल्याचे पाणी वाहून जाण्यास अडथळा होतो, तिथे जागा खोलगट करून पाण्याचा मार्ग मोकळा करणे, मोठ्या नाल्यावर जेसीबी मशीनने नालेसफाई आणि नाल्यामधून निघालेला गाळ त्वरित उचलण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली हाेती. यावेळी उपमुख्याधिकारी स्वप्निल खामकर, शहर अभियंता सुधाकर देशमुख, स्वच्छता निरीक्षक विनय वानखडे, तसेच आरोग्य विभागातील कर्मचारी यांची उपस्थिती होती. त्या अनुषंगाने शहरातील मोठे व लहान नाले मनुष्य बळाद्वारे सफाई करण्याचे कार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. शहरातील मोठे नाल्यांची सफाई पूर्णत्वाच्या मार्गावर असून, शहरातील रस्त्यालगतचे छोटे नाले साफसफाई करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहेत. कारंजा नगरपालिकेने स्वतंत्र कंत्राटदाराची नेमणूक करून शहरातील नाले स्वच्छ करण्याचे काम हाती घेतले आहे.