वाशिम जिल्ह्यात ११ आॅक्टोंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 08:12 PM2017-09-29T20:12:07+5:302017-09-29T20:13:13+5:30
वाशिम: आगामी सण, उत्सव तसेच ग्रामपंचायत निवडणूकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था कायम रहावी, याकरिता ११ आॅक्टोंबर २०१७ पर्यंत जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क

२ आॅक्टोंबरपर्यंत नवदुर्गा उत्सव आणि ३० सप्टेंबर रोजी दसरा उत्सव, १ व २ आॅक्टोंबर २०१७ रोजी मोहरम उत्सवानिमित्त मिरवणुकीचे आयोजन करण्यात येणार आहे. ३० सप्टेंबर ते २ आॅक्टोबर पर्यंत सार्वजनिक मिरवणूक काढून नवदुर्गांचे विसर्जन करण्यात येणार आहे. ७ आॅक्टोबर रोजी ग्रामपंचायत निवडणुकीकरिता मतदान होणार असून ९ आॅक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. या कालवधीत कायदा व सुव्यवस्था कायम रहावी, याकरिता ११ आॅक्टोंबरपर्यंत कालावधीत मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) नुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. या कालावधीत शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येतील अशी शस्त्रे अथवा तीक्ष्ण वस्तू जवळ बाळगणे, दाहक किंवा स्फोटक पदार्थ वाहून नेणे, जाहीरपणे प्रक्षोभक घोषणा, भाषणे करणे किंवा सुरक्षितता धोक्यात येईल अशी कृती करण्यास मनाई करण्यात आली आहे.