‘प्रीमियम’ ७00 रुपये; नुकसाभरपाई २00 रुपये

By admin | Published: July 18, 2016 02:46 AM2016-07-18T02:46:24+5:302016-07-18T02:46:24+5:30

वाशिम जिल्ह्यातील प्रकार; पीक विमा योजनेअंतर्गत शेतक-यांचे हात रिकामेच.

'Premium' 700 rupees; Recovery of 200 rupees | ‘प्रीमियम’ ७00 रुपये; नुकसाभरपाई २00 रुपये

‘प्रीमियम’ ७00 रुपये; नुकसाभरपाई २00 रुपये

Next

वाशिम/रिसोड: पीक विमा योजनेंतर्गत गतवर्षी खरीप हंगामात विमा उतरविलेल्या वाशिम जिल्हय़ातील काही शेतकर्‍यांना 'प्रीमियम'एवढी रक्कमही मिळत नसल्याचे प्रकार समोर आले आहेत. रिसोड तालुक्यातील वाकद मंडळांतर्गत ५00 ते ७00 रुपयांदरम्यान प्रीमियम भरणार्‍या अनेक शेतकर्‍यांना पिकांच्या नुकसानापोटी २00 ते २५0 रुपये मिळत आहेत.
गतवर्षी (२0१५) जिल्ह्यातील ३ लाख १ हजार ४८३ शेतकर्‍यांनी २ लाख ११ हजार ९३0 हेक्टर क्षेत्रासाठी ३९२ कोटी ५१ लाख रुपयांचा पीक विमा उतरविला होता. या विम्यासाठी २0 कोटी ३१ लाख रुपयांची रक्कम विमा हप्ता म्हणून भरण्यात आली होती.
खरीप हंगामात पावसाच्या हुलकावणीमुळे पिके करपलीत. शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले; मात्र गतवर्षीच्या नुकसान भरपाईपोटी शेतकर्‍यांना अत्यल्प नुकसानभरपाई मिळत असल्याचे प्रकार समोर येत आहेत.
रिसोड तालुक्यातील वाकद मंडळातील काहींनी हेक्टरी ७00 ते १000 रुपये प्रीमियमचा भरणा केला असला तरी शेतकर्‍यांना हेक्टरी २00 ते २५0 रुपये नुकसानभरपाई मिळत आहे. याबाबत जिल्हा मध्यवर्ती बँकेचे वाकद शाखेचे व्यवस्थापक के.जी. देशमुख यांना विचारणा केली असता, शेतकर्‍यांना हेक्टरी २00 ते २५0 रुपये विमा मंजूर झाल्याने शेतकर्‍यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. नुकसानभरपाईची रक्कम एवढी कमी का, याबाबत संबंधित विमा कंपनीकडे चौकशी करणार असल्याचे देशमुख यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना सांगितले.
मालेगाव तालुक्यातही काही शेतकर्‍यांना अत्यल्प नुकसानभरपाई मिळत आहे. बोर्डी येथील तुळशीराम रामकिसन चव्हाण या शेतकर्‍याने गतवर्षी खरीप हंगामात ५९९ रुपये प्रीमियमचा भरणा केला. आता या शेतकर्‍याला नुकसानभरपाई म्हणून ३८३ रुपये मिळाले आहेत. विमा कंपनीकडून होणार्‍या या क्रूर थट्टेचा निषेध म्हणून चव्हाण यांनी ३८३ रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांमार्फत संबंधित विमा कंपनीकडे पाठविला आहे.

Web Title: 'Premium' 700 rupees; Recovery of 200 rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.