५० कोटी वृक्ष लागवड मोहिमेची जय्यत तयारी!

By admin | Published: April 5, 2017 07:34 PM2017-04-05T19:34:38+5:302017-04-05T20:26:54+5:30

राज्यभरात राबविण्यात येणाऱ्या ५० कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत जिल्ह्यातही येत्या जुलै २०१७ मध्ये ठिकठिकाणी वृक्षलागवड केली जाणार आहे.

Preparation of 50 million tree plantation campaign! | ५० कोटी वृक्ष लागवड मोहिमेची जय्यत तयारी!

५० कोटी वृक्ष लागवड मोहिमेची जय्यत तयारी!

Next

वाशिम : राज्यभरात राबविण्यात येणाऱ्या ५० कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत जिल्ह्यातही येत्या जुलै २०१७ मध्ये ठिकठिकाणी वृक्षलागवड केली जाणार आहे. त्याची जय्यत तयारी सुरू झाली असून वनविभाग, सामाजिक वनिकरणाने वृक्षांसाठी आपापल्या स्तरावर खड्डे खोदण्यास प्रारंभ केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
५० कोटी वृक्षलागवड मोहिमेंतर्गत वृक्षारोपणासाठी आवश्यक असलेले खड्डे खोदण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित सर्व यंत्रणांना दिल्या आहेत. त्यानुसार, प्रशासकीय विभागाचे अधिकारी, कर्मचारी कामाला लागले असून ही मोहीम सर्वांगाने यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

Web Title: Preparation of 50 million tree plantation campaign!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.