कृषी विभागाकडून सूक्ष्म नियोजन आराखडा तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:51 AM2021-09-16T04:51:32+5:302021-09-16T04:51:32+5:30
ग्रामपंचायत देपूळ येथे ११ ते १७ सप्टेंबर दरम्यान शेतकऱ्यांच्या कृषीविषयक गरजा लक्षात घेता नानाजी देशमुख कृषी संजीवनी समिती सदस्य ...
ग्रामपंचायत देपूळ येथे ११ ते १७ सप्टेंबर दरम्यान शेतकऱ्यांच्या कृषीविषयक गरजा लक्षात घेता नानाजी देशमुख कृषी संजीवनी समिती सदस्य यांचे विचारमंथन करून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, उपविभागीय कृषी अधिकारी दत्तात्रय चौधरी, प्रकल्प तज्ज्ञ मिलिंद अरगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम संसाधन गावाचा नकाशाच्या आधारे, सूक्ष्म नियोजन आराखडा १५ सप्टेंबरला तयार केला आहे. या कार्यक्रमाला जिल्हा सूक्ष्म नियोजन समन्वयक शिवा गांजरे, मीराताई गांजरे, विश्वजित पाधरकर, कृषी सहाय्यक एस. वाय. घिमेकर, समूह सहाय्यक बुद्धरत्न उंदरे आदींची उपस्थिती होती. त्यांनी आराखडा बनविण्यास मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला सर्व समिती सदस्य, बचत गट महिला, ग्रामपंचायत सदस्य, गावातील प्रतिष्ठीत शेतकरी व नागरिक आदीची उपस्थिती होती.