वॉटर कप २०१९ साठी पाणी फाऊंडेशनची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 02:26 PM2018-12-08T14:26:07+5:302018-12-08T14:26:23+5:30
जोगलदरी (वाशिम) : पाणी फाऊंडेशनच्यावतीने सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा २०१९ ची तयारी सुरू करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जोगलदरी (वाशिम) : पाणी फाऊंडेशनच्यावतीने सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा २०१९ ची तयारी सुरू करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी पहिला टप्पा म्हणून गावांगावात बैठका घेऊन ग्रामस्थांना स्पर्धेची माहिती देण्यासह त्यांना स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे. या अंतर्गत मंगरुळपीर तालुक्यातील जोगलदरी येथे शुक्रवारी ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली.
वॉटर कप स्पर्धा २०१८ मध्ये वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर आणि कारंजा तालुक्यातील ५९ गावांनी सक्रीय सहभाग नोंदवित जलसंधारणाची कामे करून गाव पाणीदार करण्यासाठी परिश्रम घेतले. या स्पर्धेत मंगरुळपीर तालुक्यातील पारवा आणि कारंजा तालुक्यातील विळेगाव या ग्रामपंचायतींना तालुकास्तरीय प्रथम पुरस्काराने गौरविण्यात आले. आता वॉटर कप स्पर्धा २०१९ ची तयारी सुरू करण्यात आली असून, या स्पर्धेत गावांना सहभागी करण्याच्या उद्देशाने मार्गदर्शन करण्यासाठी गावागावांत बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे. या बैठकीत ग्रामस्थांना स्पर्धेविषयी सवीस्तर माहिती देऊन स्पर्धेत सहभागी होण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. मंगरुळपीर तालुक्यातील जोगलदरी येथे शुक्रवारी ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत पाणी फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक सुभाष नानोटे, तालुका समन्वयक समाधान वानखडे, प्रशांत मनवर, अतुल तायडे यांनी ग्रामस्थांना स्पर्धेचे स्वरुप आणि सहभागाच्या प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले. बैठकीला अनिल महाराज, शेषराव पवार, मनोज चव्हाण, यशपाल चव्हाण, मधुकर चव्हाण, प्रकाश गिद, शालिकराम सोनोने, भागीरथ सोनोने, नामदेव मनवर, गोवर्धन जाधव, उकंडा चव्हाण, अनिल चव्हाण, सेवाराम राठोड, शामराव पवार, गणेश चव्हाण, दिलिप जाधव, रमेश पवार, अशोक राठोड, गजानन डुकरे, मनोज पवार आदि ग्रामस्थांची उपस्थिती होती.