आठ हजार नागरिकांची आरोग्य पत्रिका तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 03:20 PM2019-03-04T15:20:59+5:302019-03-04T15:21:08+5:30
वाशिम : महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान समाविष्ठ असलेल्या पाच गावातील ७ हजार ९५१ नागरिकांच्या आरोग्य तपासणीअंती प्रत्येक लाभार्थीची आरोग्य पत्रिका तयार करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान समाविष्ठ असलेल्या पाच गावातील ७ हजार ९५१ नागरिकांच्या आरोग्य तपासणीअंती प्रत्येक लाभार्थीची आरोग्य पत्रिका तयार करण्यात आली आहे.
राज्यातील खाजगी आणि सार्वजनिक संस्था, उद्योगसमूह तसेच वित्तीय संस्था यांच्या सामाजिक दायित्त्व उपक्रमाच्या (सीएसआर) माध्यमातून ग्रामीण भागातील एक हजार गावांमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासह ही गावे शाश्वत विकासासाठी सक्षम करण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानातून राबविण्यात येत आहे. राज्यातील विविध सामाजिक आव्हानांना तोंड देणा-या एक हजार खेड्यांचे रुपांतर आदर्श गावांमध्ये करण्याचे मुख्य उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या अभियानात जिल्ह्यातील शेवती, वाई, वढवी, लोहारा व किनखेड ता. कारंजा या ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत लाभार्थींना प्राधान्यक्रमाने घरकुलांचा लाभ देणे, युवक व युवतींना कौशल्य विकास योजनेंतर्गत प्रशिक्षण देणे, महिला स्वयंसहायता गटांसाठी उपजिविकेच्या उपक्रमास मदत, सॅनिटरी नॅपकिन्स उत्पादन युनिटची स्थापना, एलईडी बल्ब उत्पादन युनिटची स्थापना, पशुधन व कुकुटपालनास प्रोत्साहन, शेतकरी गट स्थापन करून गटशेतीस प्रोत्साहन आदी उपक्रम राबविले जाणार आहेत. काही उपक्रमांची अंमलबजावणी चोखपणे तर काही उपक्रमांची अंमलबजावणी संथगतीने असल्याचे दिसून येते. या गावातील आरोग्य तपासणी झाल्यानंतर एकूण ७ हजार ९५१ नागरिकांची आरोग्य पत्रिका तयार करण्यात आली आहे.