पोहरादेवीत ऐतिहासीक नंगारा महोत्सवाची तयारी अंतीम टप्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 02:32 PM2018-11-30T14:32:00+5:302018-11-30T14:32:48+5:30
मानोरा : बंजाराची काशी म्हणुन ओळखल्या जाणाºया तिर्थक्षेत्र पोहरादेवीत ऐतिहासीक नंगारा वास्तुचे भूमिपुजन सोहळा येत्या ३ डिसेंबरला होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा : बंजाराची काशी म्हणुन ओळखल्या जाणाºया तिर्थक्षेत्र पोहरादेवीत ऐतिहासीक नंगारा वास्तुचे भूमिपुजन सोहळा येत्या ३ डिसेंबरला होणार आहे. या महोत्सवाची शोभा वाढविण्यासाठी देशभरातुन भाविक लाखोच्या संख्येने उपस्थित राहणार आहे. यासाठी महंत समाजाचे नेते आपली संपूर्ण प्रतिष्ठा पणाला लावत आहे.
राज्य शासनाने पोहरादेवीच्या विकास व्हावा म्हणुन १२५ कोटीचा विकास आराखडा तयार केला. त्यापैकी २५ कोटीच्या विकास कामाला २२ नोव्हेंबर २०१७ रोजी मंजुरात दिली. १३ मार्च रोजी कार्यारंभ ही आदेश दिला,त्यानुसार १.४० कोटीचे भक्त निवास , १.६० कोटींचे खुले सभागृह, ८.८४ कोटीचे वास्तु प्रदर्शनी , केंद्राच्या बांधकामासह २५ कोटीची विविध विकास कामे होणार आहे. धर्मगुरु डॉ.रामराव महाराज यांच्या मार्गदर्शनात व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाक रे उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाला किमान ५ लाख भाविक उपस्थित राहतील. यासाठी देशभरातील प्रत्येक राज्यातुन बंजारा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहावा यासाठी ठिकठिकाणी बैठका घेवुन पोहरादेवी येथे होत असलेल्या कार्यक्रमाची व्याप्ती व पोहरादेवीच्या विकासाचा आराखडा सामान्य समाज बांधवापर्यंत पोहोचवण्याचे काम युध्द पातळीवर चालु असून यासाठी एक जंबो नियोजन समिती गठण करण्यात आली आहे. त्या समितीमध्ये इतर राज्यातील सुध्दा प्रतिनिधींना स्थान देण्यात आले आहे . हा सोहळा एका राजकीय पक्षाचा नसून सर्वांचा असल्याने संपूर्ण बंजारा समाज एकत्रीत झाला आहे. महंतापासुन तर लहान सामान्य व्यक्तीपर्यंत त्याचे कार्यक्रमाचे नियोजन ठरले आहे. कार्यक्रमस्थळी येणाºया सर्व मार्गावर भाविकांना जेवणाची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. समाजातील हजारो स्वयंमसेवक स्वयंमस्फुर्तीने सेवा देणार आहे. धर्मगुरु संत डॉ.रामराव महाराज यांच्या ध्वनीफितीव्दारे समाज बांधवांना आवाहनही करण्यात आले आहे. यावेळी वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री हा सोहळा अधिक व्यापक व्हावा यासाठी संपूर्ण देशात बैठका बोलविल्या आहे. बारा एकरामध्ये लोकांना बसण्यासाठी मंडप सज्ज झाला आहे. तसेच मुख्यमंत्री व उध्दव ठाकरे यांच्या हेलीपॅडचीही व्यवस्था करण्यात आली असून प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.