१५ दिवसानंतर पावसाची हजेरी; पिकांना आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 11:22 AM2020-06-27T11:22:24+5:302020-06-27T11:22:42+5:30
जिल्ह्यात केवळ १८.२३ टक्केच पाऊस पडला असून, गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावसात १७.४५ टक्क्यांची तूट आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: गेल्या १५ दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने गुरुवारी रात्री जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. जवळपास दोन तास पाऊस पडल्याने १०२ मि. मी. पावसाची नोंद झाली असून, पावसाअभावी करपण्याच्या स्थितीत असलेल्या पिकांना या पावसामुळे मोठा आधार झाला आहे. शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे. तथापि, जिल्ह्यात केवळ १८.२३ टक्केच पाऊस पडला असून, गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावसात १७.४५ टक्क्यांची तूट आहे.
यंदाच्या जूनच्या पहिल्याच आठवड्यात आलेल्या पावसानंतर शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली. त्यामुळे यंदा १८ जूनपर्यंतच जिल्ह्यात ८१ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली होती. गेल्या १५ दिवसांत काही भागांत आलेल्या तुरळक पावसामुळे पेरणीचे प्रमाण वाढतच गेले होते. तथापि, कारंजा तालुक्यातील धनज बु. येथे २४ जून रोजी पडलेला दमदार पाऊस वगळता १४ जूननंतर जिल्ह्यात कोठेही जोरदार असा पाऊसच पडला नाही. त्यामुळे उगवलेली पिके संकटात सापडली होती. दरम्यान, गुरुवारी रात्री जिल्ह्यात पावसाने दमदा हजेरी लावली. त्यामुळे पिकांना मोठा आधार मिळाला. दरम्यान, जिल्ह्यातील काही गावांत अद्यापही पावसाची प्रतिक्षा शेतकºयांना आहे.
पावसाची टक्केवारी केवळ १८.२३
जिल्ह्यातील बहुतांश भागांत गुरुवारी रात्री जवळपास दोन तास पाऊस पडला. त्यात एकूण १०२.१३ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. यामध्ये रिसोड तालुक्यात ३०.१३ मि.मी., ७५ कारंजा तालुक्यात २२.मंगरुळपीर तालुक्यात १९.०० मि.मी., वाशिम तालुक्यात १५.६३ मि.मी., मानोरा तालुक्यात ८.३७ मि.मी, तर मालेगाव तालुक्यात ६.२५ मि.मी. पाऊस पडला. गुरुवारी रात्री पडलेला पाऊस मिळूनही जिल्ह्यात २६ जूनपर्यंत १८.२३ टक्के पाऊस झाला आहे. गतवर्षी २५ जूनपर्यंतच जिल्ह्यात ३५.६८ टक्के पावसाची नोंद झाली होती. अर्थात गतवर्षीच्या तुलनेत यंदा