पावसाची हजेरी; शेतकरी सुखावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:29 AM2021-06-25T04:29:12+5:302021-06-25T04:29:12+5:30

जिल्ह्यात २३ जूनअखेर सुमारे ८० टक्के क्षेत्रावर खरीप हंगामातील पिकांची पेरणी प्रक्रिया आटोपली आहे. अशात पावसाने दडी मारल्यामुळे अनेक ...

The presence of rain; The farmer sighed | पावसाची हजेरी; शेतकरी सुखावला

पावसाची हजेरी; शेतकरी सुखावला

Next

जिल्ह्यात २३ जूनअखेर सुमारे ८० टक्के क्षेत्रावर खरीप हंगामातील पिकांची पेरणी प्रक्रिया आटोपली आहे. अशात पावसाने दडी मारल्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे; मात्र गुरुवारच्या पावसाने काहीअंशी दिलासा मिळाला असून पिकांना नवसंजीवनी मिळाल्याचे दिसून येत आहे.

.............................

शुद्ध पाणी पुरविण्याची मागणी

वाशिम : शहरातील धृव चाैकासह इतर काही भागात अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. याकडे नगरपरिषदेने लक्ष पुरवून शुद्ध पाणी पुरविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संदीप चिखलकर यांनी गुरुवारी केली.

.......................

प्रवाशांनी ‘मास्क’चा वापर करण्याचे आवाहन

वाशिम : एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून तोंडाला ‘मास्क’ परिधान करावा, असे आवाहन येथील आगारप्रमुख विनोद इलामे यांनी केले आहे.

...................

गुंडांबाबत माहिती देण्याचे आवाहन

वाशिम : गुंडगिरी करणाऱ्या इसमांवर कठोर कारवाई करण्यास प्रशासन सज्ज आहे. त्यामुळे कुठलीही भीती न बाळगता नागरिकांनी गुंड प्रवृत्तीच्या इसमांबाबत माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शन्मुगराजन एस. यांनी केले आहे.

Web Title: The presence of rain; The farmer sighed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.