पंतप्रधानांसमोर होणार डिजिटल शाळांचे सादरीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 02:24 AM2017-09-29T02:24:46+5:302017-09-29T02:24:57+5:30

वाशिम : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रातील भेटीदरम्यान राज्यातील ‘डिजिटल शाळा व लोकसहभाग’ या विषयावर ५ ऑक्टोबरला मुंबई येथे सादरीकरण होणार आहे. सादरीकरणासाठी राज्यातील १३ जणांची चमू तयार केली असून, यामध्ये पश्‍चिम वर्‍हाडातून वाशिम येथील देवीदास महाले या एकमेव शिक्षकाची वर्णी लागली आहे.

Presentation of Digital Schools to the Prime Minister | पंतप्रधानांसमोर होणार डिजिटल शाळांचे सादरीकरण

पंतप्रधानांसमोर होणार डिजिटल शाळांचे सादरीकरण

Next
ठळक मुद्देराज्यातील १३ जणांची चमू देणार माहिती पश्‍चिम वर्‍हाडातून वाशिमच्या एकमेव शिक्षकाची वर्णी

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रातील भेटीदरम्यान राज्यातील ‘डिजिटल शाळा व लोकसहभाग’ या विषयावर ५ ऑक्टोबरला मुंबई येथे सादरीकरण होणार आहे. सादरीकरणासाठी राज्यातील १३ जणांची चमू तयार केली असून, यामध्ये पश्‍चिम वर्‍हाडातून वाशिम येथील देवीदास महाले या एकमेव शिक्षकाची वर्णी लागली आहे.
 गत दोन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व गावकर्‍यांच्या लोकवर्गणीतून ‘डिजिटल शाळा’ हा उपक्रम साकारण्यात येत आहे. ‘डिजिटल शाळे’च्या माध्यमातून अध्ययन, अध्यापन, व्यवस्थापन व समन्वय यातून मुलांच्या शिक्षणाला गती देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा शिक्षण विभागाने केला. 
‘डिजिटल शाळे’ची मुले संगणक हाताळणी करण्याबरोबरच हव्या त्या संकेतस्थळाला भेट देण्याचा अनुभव घेत आहेत. 

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रातील भेटीदरम्यान राज्यातील ‘डिजिटल शाळा व लोकसहभाग’ या विषयावर मुंबई येथे सादरीकरण होणार आहे. सादरीकरणासाठी राज्यभरातून १३ जणांची चमू असून, यामध्ये पश्‍चिम वर्‍हाडातून वाशिम येथील देवीदास महाले या एकमेव शिक्षकाची वर्णी लागली आहे.
- अंबादास मानकर
शिक्षणाधिकारी (प्राथमिक) वाशिम.

Web Title: Presentation of Digital Schools to the Prime Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.