सोयाबीन अनुदानापासून वंचित वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या याद्या सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 05:35 PM2018-03-22T17:35:42+5:302018-03-22T17:35:42+5:30
वाशिम: लोकमतने ‘सोयाबीन अनुदान पाच महिन्यांपासून बँकेतच’ या मथळ्याखाली २१ मार्च रोजी वृत्त प्रकाशित केले . त्याची दखल घेत स्टेट बँकेच्या कारंजा आणि वाशिम शाखेने घेत या याद्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे सादर केल्या आहेत.
वाशिम: जिल्ह्यातील स्टेट बँकेच्या सहा शाखांकडून सोयाबीन अनुदानास पात्र असलेल्या ११ हजार ७९० लाभार्थ्यांचे तीन कोटी ५९ लाख ४३ हजार रुपयांचे अनुदान गेल्या पाच महिन्यांपासून वितरित करण्यात आले नव्हते. खाते क्रमांकातील चुका आणि याद्यामंधील चुकांमुळे हा प्रकार घडला आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे चुकीचे खाते क्रमांक आणि शेतकऱ्यांच्या चुकीच्या याद्या पाठविणे आवश्यक असताना त्याची दखल घेण्यात येत नव्हती. या संदर्भात लोकमतने ‘सोयाबीन अनुदान पाच महिन्यांपासून बँकेतच’ या मथळ्याखाली २१ मार्च रोजी वृत्त प्रकाशित केले . त्याची दखल घेत स्टेट बँकेच्या कारंजा आणि वाशिम शाखेने घेत या याद्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे सादर केल्या आहेत.
राज्य शासनाने आॅक्टोबर २०१६ ते ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत बाजार समित्यांमध्ये सोयाबीन विकलेल्या शेतकºयांना २०० रुपये प्रति क्ंिवटल आणि कमाल २५ क्विंटलपर्यंत अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार वाशिम जिल्ह्यातील ४४६१८ शेतकºयांना अनुदानापोटी १४ कोटी ७९ लाख १३५९४ रुपयांची रक्कम मंजूर झाली होती. जिल्ह्यातील विविध बँका, सहकारी बँका, नागरी बँका आणि पतसस्थांमध्ये जमा करण्यासाठी याद्या आणि रक्कम जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून नोव्हेंंबर २०१७ मध्ये पाठविण्यात आल्या आणि बहुतांश बँकांनी शेतकºयांच्या खात्यात अनुदान जमाही केले; परंतु स्टेट बँकेच्या वाशिम जिल्ह्यातील सहा शाखांच्या अंतर्गत येणाºया सभासद शेतकºयांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा झाली नव्हती. सोयाबीन अनुदानापासून वंचित असलेल्या शेतकºयांकडून वारंवार जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे विचारणा करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून या संदर्भात जिल्हाधिकाºयांकडे पत्र सादर करण्यात आले होते. लोकमतने २१ मार्च रोजीच्या अंकात ‘सोयाबीन अनुदान पाच महिन्यांपासून बँकेतच’ या मथळ्याखाली २१ मार्च रोजी वृत्त प्रकाशित करून बँकाचे लक्ष वेधले. त्यानंतर वाशिम आणि कारंजा येथील स्टेट बँकेच्या शाखांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे चुकीचे खातेक्रमांक असलेल्या शेतकºयांच्या याद्या सादर केल्या.
मंगरुळपीरच्या शाखेसह ग्रामीण शाखांतील याद्या अप्राप्तच
खातेक्रमांकातील चुकांमुळे सोयाबीन अनुदानापासून वंचित असलेल्या शेतकºयांच्या याद्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून सादर करण्यासाठी वारंवार मागणी करण्यात येत असताना लोकमतच्या वृत्तानंतर वाशिम आणि कारंजा येथील स्टेट बँकेने याद्या सादर केल्या असल्या तरी, मंगरुळपीरच्या मुख्य शाखेसह या तिन्ही तालुक्यातील स्टेट बँकेच्या ग्रामीण भागातील शाखांकडून अद्यापही जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे याद्या सादर करण्यात आलेल्या नाहीत.